Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले, एका झटक्यात चांदी ₹१२,२२५ नं स्वस्त; Gold च्या किंमतीत किती घसरण, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:35 IST

Gold Silver Price 8 Jan 2026: आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. पाहा काय आहे नवी किंमत.

Gold Silver Price 8 Jan 2026: आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. चांदीच्या किमतीत एका झटक्यात १२,२२५ रुपयांची घट झाली, तर सोनं १,२३२ रुपयांनी स्वस्त झालं आहे. जीएसटीशिवाय (GST) चांदीचा भाव २,३५,७७५ रुपये प्रति किलोवर आला आहे. जीएसटीसह चांदी आता २,४२,८४८ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. दुसरीकडे, २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह आता १,३९,५०६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. जीएसटीशिवाय आज सोन्याचे भाव १,२३२ रुपयांच्या घसरणीसह १,३५,४४३ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले.

ऐतिहासिक उच्चांकावरून दरात कपात

बुधवारी जीएसटीशिवाय चांदी २,४८,००० रुपयांच्या 'ऑल टाइम हाय' (All-time high) स्तरावर बंद झाली होती. त्याचप्रमाणे, सोनं जीएसटीशिवाय १,३६,६७५ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते. २९ डिसेंबर २०२५ रोजी सोन्यानं १,३८,१८१ रुपयांचा उच्चांक गाठला होता, त्या तुलनेत आता सोनं २,७१८ रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर ७ जानेवारीच्या २,४८,००० रुपयांच्या उच्चांकाच्या तुलनेत चांदी १२,२२५ रुपयांनी स्वस्त झाली आहे. हे दर IBJA (इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन) द्वारे जारी करण्यात आले आहेत. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते – एकदा दुपारी १२ च्या सुमारास आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ च्या सुमारास हे दर जारी केले जातात.

अनिल अग्रवाल यांच्या कुटुंबात कोण-कोण? आता कोणाच्या खांद्यावर असेल ३५,००० कोटींच्या वेदांता समूहाची जबाबदारी

कॅरेटनुसार सोन्याचे आजचे भाव

  • २३ कॅरेट सोनं: आज २३ कॅरेट सोन्याचे दर १,२२७ रुपयांनी घसरून १,३४,९०१ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले. जीएसटीसह याची किंमत आता १,२८,९४८ रुपये झाली आहे. यामध्ये अद्याप मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.
  • २२ कॅरेट सोनं: २२ कॅरेट सोन्याची किंमत १,१२८ रुपयांनी स्वस्त होऊन १,२४,०६६ रुपये प्रति १० ग्रॅमवर आली आहे. जीएसटीसह हा दर १,२७,७८७ रुपये आहे.
  • १८ कॅरेट सोनं: १८ कॅरेट सोन्यात ९२४ रुपयांची घसरण झाली असून आज ते १,०१,५८२ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले. जीएसटीसह याची किंमत १,०४,६२९ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली.
  • १४ कॅरेट सोनं: १४ कॅरेट सोन्याचा दर ७२१ रुपयांनी घसरला आहे. आज हे सोनं ७९,२३४ रुपयांवर उघडलं असून जीएसटीसह याची किंमत ८१,६११ रुपये झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold, Silver Prices Plummet: Silver Drops Sharply, Gold Follows

Web Summary : Gold and silver prices crashed today. Silver fell by ₹12,225 per kg, while gold decreased by ₹1,232 per 10 grams, excluding GST. Current rates: silver ₹2,35,775/kg (without GST), 24K gold ₹1,35,443/10g (without GST).
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक