Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज थोडी घसरण पाहायला मिळाली, सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचे दर आज २१२ रुपयांनी स्वस्त होऊन विना जीएसटी १०९२२३ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. तर चांदीच्या दरातही ३२७ रुपयांची घसरण झाली.
या सप्टेंबरमध्ये सोनं प्रति १० ग्रॅम ६८३५ रुपयांनी महाग झालं आहे. तर चांदीच्या किमतीत प्रति किलो ६६९५ रुपयांनी वाढ झाली आहे. आयबीजेएच्या दरांनुसार, ऑगस्टच्या शेवटच्या व्यापाराच्या दिवशी सोनं प्रति १० ग्रॅम १०२३८८ रुपयांवर बंद झालं. चांदी देखील प्रति किलो ११७५७२ रुपयांवर बंद झाली.
४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
जीएसटी लागू झाल्यानंतर, सराफा बाजारात चांदीचा दर प्रति किलो १२७८६८ रुपये झाला आहे. तर, सोनं प्रति १० ग्रॅम ११२६९१ रुपये झालंय. आयबीजेएनुसार, बुधवारी, जीएसटीशिवाय चांदीचा दर प्रति किलो १२४५९४ रुपये झाला. तर, सोनं प्रति १० ग्रॅम १०९६३५ रुपये झालं.
२३ ते १४ कॅरेट सोन्याचे दर काय?
आज २३ कॅरेट सोन्याचा भावही २१० रुपयांनी घसरून १०८७८६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जीएसटीसह त्याची किंमत आता ११२०४९ रुपये झालीये. त्यात मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. २२ कॅरेट सोन्याचा भाव ३७८ रुपयांनी घसरून १०००४८ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. जीएसटीसह तो १०३०४९ रुपये झालाय.
आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ३०९ रुपयांनी घसरून ८१९१७ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला आणि जीएसटीसह तो ८४३७४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. त्याच वेळी, १४ कॅरेट सोन्याचा भाव आता जीएसटीसह ६५८१२ रुपयांवर पोहोचला आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ने सोने आणि चांदीच्या स्पॉट किमती जाहीर केल्या आहेत. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असण्याची शक्यता आहे. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात.