Investment Ideas for Gen-Z: गुंतवणुकीचा एक जुना नियम आहे की, ती जितक्या लवकर सुरू केली जाते, तितका भविष्यात मोठा नफा मिळतो. सध्या केवळ देशातच नव्हे, तर जगाच्या विविध भागांत 'Gen-Z' चा प्रभाव वाढत आहे. १९९७ ते २०१२ या काळात जन्मलेल्या मुलांना 'Gen-Z' म्हटलं जातं. जर तुम्ही या पिढीतील असाल आणि तुमचं वय २० वर्षांच्या आसपास असेल, तर तुम्ही केवळ १००० रुपयांच्या एसआयपी (SIP) द्वारे करोडपती होऊ शकता. इतकंच नाही, तर आतापासून १००० रुपयांची एसआयपी सुरू केल्यास निवृत्तीपर्यंत (वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत) तुम्ही एक मोठी रक्कम जमा करू शकता.
१००० रुपयांच्या एसआयपीने कसे होऊ शकता कोट्यधीश?
जर तुमचं वय २० वर्षे असेल आणि तुम्ही आतापासूनच १००० रुपयांची एसआयपी सुरू केली, तर १२ टक्के वार्षिक अंदाजित परताव्यानुसार निवृत्तीपर्यंत साधारणपणे ९७.९३ लाख रुपयांचा फंड तयार होऊ शकतो. जर तुम्हाला दरवर्षी १५ टक्के वार्षिक अंदाजित परतावा मिळाला, तर तुम्ही याच वयात केवळ कोट्यधीश होणार नाही, तर २.३० कोटी रुपयांची मोठी रक्कम उभी करू शकता. मात्र, एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्युच्युअल फंड एसआयपीची कामगिरी पूर्णपणे शेअर बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असते.
१ मार्चपासून बदलणार सिम, बँक, एलपीजी, ट्रेन तिकिटाचे नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम, पाहा
एसआयपी सुरू करण्यापूर्वी या गोष्टींची घ्या काळजी
एसआयपीमध्ये तुम्ही जितक्या जास्त काळासाठी गुंतवणूक चालू ठेवता, तितका जास्त नफा तुम्हाला मिळतो असं म्हटलं जातं, कारण यामध्ये 'कंपाउंडिंग'चा प्रचंड फायदा मिळतो. एसआयपीमध्ये कधीही एकाच प्रकारचा परतावा मिळत नाही. जर बाजारात तेजी असेल तर तुम्हाला जास्त परतावा मिळेल, पण जर बाजार घसरला तर नफा होण्याऐवजी नुकसानही होऊ शकतं.
परंतु, दीर्घकालीन गुंतवणुकीत नुकसानीची जोखीम खूप कमी होते. याव्यतिरिक्त, एसआयपीमधून मिळणाऱ्या परताव्यावर तुम्हाला 'कॅपिटल गेन्स टॅक्स' देखील भरावा लागतो. अशा परिस्थितीत, तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी थोड्या जास्त काळासाठी गुंतवणूक सुरू ठेवणं अधिक फायदेशीर ठरेल.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही जोखमीची असते. यातील परतावा हा शेअर बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Gen-Z can potentially amass a substantial retirement fund by starting a ₹1000 SIP early. Investing early yields significant long-term gains, with potential returns leading to crores by retirement. Remember market risks exist; seek expert advice before investing.
Web Summary : Gen-Z पीढ़ी ₹1000 की SIP से करोड़पति बन सकती है। जल्दी निवेश करने से अच्छा रिटर्न मिलता है, जिससे रिटायरमेंट तक करोड़ों जमा हो सकते हैं। बाज़ार के जोखिमों को ध्यान में रखें और निवेश से पहले विशेषज्ञ की सलाह लें।