Join us

आर्थिक नियोजनात इमर्जन्सी फंड सर्वात महत्त्वाचा का आहे? कुठे आणि कसा करायचा वापर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 12:16 IST

Emergency Fund : आर्थिक नियोजन करताना आपत्कालीन निधी महत्त्वाची भूमिका बजावतो. जेव्हा आपण आर्थिक सल्लागाराकडे जातो तेव्हा तो आपल्याला आपत्कालीन निधी तयार करण्याचा सल्ला देतो.

Financial Planning : तुम्ही कितीही पैसे कमावत असले तरीही जर आर्थिक नियोजन नसेल तर पैसा कुठे जातो हे कळणार देखील नाही. आर्थिक नियोजन करताना आपत्कालीन निधी (Emergency Fund) तयार करणे सध्याच्या काळात आवश्यक झाले आहे. आपत्कालीन निधी किती मोठा असावा हे आपली बचत किती आहे यावर अवलंबून असते. आपत्कालीन निधीची गरज का आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर या याविषयी अधिक जाणून घेऊ.

आपत्कालीन निधी का आवश्यक आहे?कोणतंही आर्थिक संकट सांगून येत नाही. अशा परिस्थितीत आपण कोणत्याही आर्थिक समस्येसाठी आधीच तयार असले पाहिजे. अनेकवेळा अडचणीच्या वेळी आपण आपल्या नातेवाईकांची मदत घेतो, पण जर आपल्याला मदत मिळाली नाही तर आपल्याला कर्ज किंवा व्याजावर पैसे घ्यावे लागतात. अशा परिस्थितीत आपत्कालीन निधीची खूप मदत होते. त्यातून आर्थिक मदतीसोबत मानसिक शांती मिळते.

आपत्कालीन निधी कसा तयार करावा?तुम्ही इमर्जन्सी फंड अगदी सहज तयार करू शकता. हा निधी तयार करण्यासाठी, तुम्हाला तुमचा खर्च आणि बचत योग्यरित्या व्यवस्थापित करावी लागेल. तुम्हाला तुमच्या बचतीचा ठराविक भाग तुमच्या आपत्कालीन निधीमध्ये दरमहा टाकावा लागेल. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यासाठी वेगळे बचत खाते देखील उघडू शकता जेणेकरून तुम्हाला बचतीसोबतच परताव्यांचा लाभ मिळेल. या फंडात जमा केलेली रक्कम फक्त आपत्कालीन परिस्थितीतच वापरा.

आपत्कालीन निधीतून पैसे कधी काढायचे?आपत्कालीन निधी तयार केल्यानंतर प्रश्न पडतो की हा निधी कधी वापरायचा? लहान खर्चासाठी तुम्ही कधीही त्याचा वापर करू नये. लक्षात ठेवा हा फक्त आर्थिक संकटातच वापरायला हवा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल. तर वापरू नका. वैद्यकीय आणीबाणीच्या काळात याचा वापर होईल. 

टॅग्स :गुंतवणूकबँकिंग क्षेत्रपैसा