EPFO New Updates: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) सेवांबाबत वारंवार तक्रारी येत होत्या. क्लेम सेटलमेंटमध्ये विलंब, जास्त कागदपत्रांची गरज आणि नियोक्त्यावर अवलंबित्व. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार लवकरच EPFO 3.0 प्रणाली लागू करण्याच्या तयारीत आहे. या नव्या डिजिटल अपग्रेडमुळे PF खात्याचा वापर अधिक सोपा आणि जलद होणार आहे.
क्लेम सेटलमेंट होणार जलद आणि सुलभ
EPFO 3.0 अंतर्गत सर्वात मोठा बदल म्हणजे क्लेम सेटलमेंट प्रक्रियेत होणारी सुधारणा आहे. ऑटो-क्लेम सेटलमेंटची मर्यादा वाढवून ₹५ लाखांपर्यंत करण्यात आली आहे. अनेक क्लेम आता ऑटोमॅटिक मंजूर केले जात आहेत. यामुळेच वेळेची बचत होऊन मॅन्युअल प्रक्रियेची गरज कमी होणार आहे.
नियोक्त्यावर अवलंबित्व कमी
पूर्वी नोकरी बदलल्यावर पीएफ ट्रान्सफरसाठी नियोक्त्याच्या मंजुरीची आवश्यकता असे, ज्यामुळे विलंब होत असे. आता KYC पूर्ण असलेल्या खात्यांसाठी ट्रान्सफर ऑटोमॅटिक होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांचे पैसे सहजपणे ट्रान्सफर करता येणार आहेत.
UPI आणि ATM द्वारे PF विड्रॉल
EPFO नवीन डिजिटल पेमेंट प्रणालीवर काम करत आहे. लवकरच UPI च्या माध्यमातून पीएफ काढणे शक्य होईल. पैसे थेट बँक खात्यात जलद जमा होतील. भविष्यात ATM द्वारेही पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते.
नवीन मोबाईल अॅप येणार...
क्लेम फाइल करणे, ट्रॅक करणे आणि पैसे काढणे या सर्व सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी नवीन मोबाईल अॅप लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. यामुळे ऑफिसला जाण्याची आणि कागदपत्रांची गरज मोठ्या प्रमाणात कमी होईल.
युनिफाइड पेन्शन सिस्टम लागू
EPFO 3.0 अंतर्गत पेन्शन प्रणालीतही सुधारणा करण्यात आली आहे. युनिफाइड पेन्शन पेमेंट सिस्टम आधीच देशभरातील कार्यालयांमध्ये लागू करण्यात आली आहे. यामुळे पेन्शनचे वितरण अधिक जलद आणि पारदर्शक होणार आहे.
डिजिटल व्हेरिफिकेशनकडे वाटचाल
सरकार EPFO प्रणालीला पारंपरिक पद्धतीऐवजी बँकिंग प्लॅटफॉर्मसारखे डिजिटल स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहे. ऑटोमेशन आणि डिजिटल व्हेरिफिकेशनमुळे तांत्रिक अडचणी आणि प्रशासनिक विलंब कमी होण्याची अपेक्षा आहे.
Web Summary : EPFO 3.0 promises faster claim settlements, reduced reliance on employers, and UPI-based withdrawals. A new mobile app and unified pension system aim to simplify PF management, making it more digital and efficient for users.
Web Summary : EPFO 3.0 त्वरित दावा निपटान, नियोक्ताओं पर कम निर्भरता और UPI-आधारित निकासी का वादा करता है। एक नया मोबाइल ऐप और एकीकृत पेंशन प्रणाली पीएफ प्रबंधन को सरल बनाने, इसे उपयोगकर्ताओं के लिए अधिक डिजिटल और कुशल बनाने का लक्ष्य रखते हैं।