Join us
Daily Top 2Weekly Top 5

पीएफ खातेदारांसाठी 'गुड न्यूज'! सलग तिसऱ्या वर्षी 'इतके' व्याज मिळण्याची शक्यता, 'या' दिवशी निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 15:38 IST

PF Interest Rate 2026-27 : आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ईपीएफओ भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर ८.२५% ठेवेल अशी अपेक्षा आहे. येत्या काळात स्थिर परतावा मिळवणे कठीण होऊ शकते.

PF Interest Rate : भविष्य निर्वाह निधीच्या कोट्यवधी सभासदांचे लक्ष लागून असलेल्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या व्याजदराबाबत लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. २ मार्च रोजी होणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या 'सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज'च्या बैठकीत व्याजाचा दर निश्चित केला जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, यंदाही व्याजाचा दर ८.२५ टक्के इतकाच स्थिर ठेवला जाऊ शकतो.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

८.२५ टक्के व्याजदर कायम राहणार?गेल्या दोन वर्षांपासून ईपीएफओने ८.२५ टक्के दराने व्याज दिले आहे. यंदाही गुंतवणुकीतून मिळालेला परतावा पाहता, हा दर कायम ठेवणे संघटनेला सहज शक्य असल्याचे बोलले जाते. पीएफवरील परतावा थेट कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या पुंजीशी संबंधित असल्याने, व्याजदर स्थिर राहणे हा गुंतवणूकदारांसाठी मोठा दिलासा ठरेल. ईपीएफओकडे सध्या पुरेसा 'सरप्लस' निधी उपलब्ध आहे, ज्यामुळे व्याजदरात कपात करण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

ईपीएफओचे २५ लाख कोटींचे 'फंड मॅनेजमेंट'ईपीएफओ सध्या सुमारे २५ ते २६ लाख कोटी रुपयांचा प्रचंड मोठा निधी सांभाळत आहे. या निधीची गुंतवणूक खालीलप्रमाणे विभागली गेली आहे.

  • राज्य विकास कर्ज : ४१ टक्के
  • केंद्र सरकारी सिक्युरिटीज : १६ टक्के
  • कॉर्पोरेट बाँड्स : १५.९ टक्के
  • ईटीएफ : ९.५ टक्के

नवीन सुधारणा आणि गुंतवणुकीचे पर्याय

२ मार्चच्या बैठकीत केवळ व्याजदरावरच नव्हे, तर 'सोशल सिक्युरिटी डिलिव्हरी' मजबूत करण्यावरही चर्चा होणार आहे. पीएफ खात्यातून पैसे काढणे किंवा ट्रान्सफर करणे अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी नवीन रिफॉर्म्स आणले जाऊ शकतात. येणाऱ्या काळात ८.२५ टक्क्यांसारखा उच्च परतावा कायम राखणे कठीण होऊ शकते. त्यामुळे ईपीएफओ गुंतवणुकीचे नवीन आणि अधिक फायदेशीर मार्ग शोधण्याची शक्यता आहे.

वाचा - SIP मधून श्रीमंत व्हायचंय? मग 'इतकी' वर्षे तरी थांबाच! गुंतवणुकीचा पैसा नेमका कधी वेगाने वाढतो?

बैठकींचे सत्र सुरू१६ फेब्रुवारी रोजी केंद्रीय कामगार सचिव वंदना गुरनानी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समितीची ११६ वी बैठक पार पडली. या बैठकीत विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. आता सर्वांचे लक्ष २ मार्चच्या मुख्य बैठकीकडे आहे, ज्याचे अध्यक्षपद केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया भूषवतील. 

English
हिंदी सारांश
Web Title : Good news for PF holders: Expected interest rate decision soon.

Web Summary : PF subscribers may receive 8.25% interest for the third year. The EPFO's Central Board of Trustees will decide on March 2nd. Sufficient surplus funds make interest rate cuts unlikely, benefiting retirees. Reforms are expected to streamline withdrawals and transfers.
टॅग्स :ईपीएफओगुंतवणूककर्मचारी