EPF Retirement Planning : नोकरीच्या प्रदीर्घ प्रवासानंतर एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडमध्ये एक मोठी रक्कम जमा होते. मात्र, खऱ्या आव्हानाला सुरुवात होते ती निवृत्तीनंतर. हा जमा झालेला निधी पुढील २०-२५ वर्षे कसा पुरवायचा आणि त्यातून नियमित उत्पन्न कसे मिळवायचे, हा पेच अनेक ज्येष्ठांसमोर असतो. ईपीएफचे नियम आणि मालमत्ता वाटपाचे योग्य गणित समजून घेतल्यास निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुखकर होऊ शकते.
ईपीएफ व्याजाचे गणित: ५८ की ६१?
- ईपीएफ नियमांनुसार, ५८ हे निवृत्तीचे अधिकृत वय आहे.
- जर तुम्ही ५८ व्या वर्षी निवृत्त झालात, तर तुमच्या ईपीएफ शिलकीवर पुढील ३ वर्षे, म्हणजेच वयाच्या ६१ व्या वर्षापर्यंत व्याज मिळत राहते. जर तुम्ही वयाच्या ५५ व्या वर्षी निवृत्ती घेतली, तर तुम्हाला केवळ ५८ व्या वर्षापर्यंतच व्याज मिळेल. त्यामुळे व्याजाचा लाभ घेण्यासाठी निवृत्तीचे वय आणि विड्रॉलचा काळ यांचा ताळमेळ बसवणे गरजेचे आहे.
केवळ 'ईपीएफ'वर अवलंबून राहणे धोक्याचे!
- तज्ज्ञांच्या मते, ईपीएफ हे बचतीचे साधन आहे, नियमित उत्पन्नाचे नाही. निवृत्तीनंतर महागाईचा सामना करण्यासाठी केवळ एकाच पर्यायावर अवलंबून राहण्यापेक्षा पोर्टफोलिओमध्ये विविधता हवी.
- गॅरंटीड परतावा : सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम आणि बँक एफडी हे सुरक्षित उत्पन्नाचे स्रोत आहेत.
- लिक्विडिटी आणि टॅक्स : डेट म्युच्युअल फंडातून गरज पडेल तेव्हा पैसे काढण्याची सुविधा आणि कर सवलत मिळते.
- इक्विटीचा विसर नको : निवृत्तीनंतर अनेकजण शेअर बाजारापासून दूर जातात, पण महागाईवर मात करण्यासाठी पोर्टफोलिओचा १५-२०% हिस्सा इक्विटी किंवा हायब्रिड फंडात असणे आवश्यक आहे.
३ कोटींचा आदर्श पोर्टफोलिओ कसा असावा?
- जर तुमच्याकडे निवृत्तीनंतर ३ कोटी रुपयांचा निधी असेल, तर त्याचे वाटप खालीलप्रमाणे करता येईल.
- ४०-५०% निश्चित उत्पन्न : (EPF, SCSS, FD)
- ३०-३५% डेट इन्स्ट्रुमेंट : (रोखे किंवा डेट फंड)
- १५-२०% इक्विटी : (दीर्घकालीन वाढीसाठी)
- इमर्जन्सी फंड : काही रक्कम तातडीच्या खर्चासाठी वेगळी ठेवावी.
लंपसम निधीचे नियमित उत्पन्नात रूपांतर कसे करावे?
- सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन : हाती आलेली मोठी रक्कम एकदम इक्विटीत न गुंतवता एसटीपीद्वारे हळूहळू गुंतवावी, जेणेकरून बाजारातील अस्थिरतेचा धोका कमी होतो.
- सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन : दरमहा ठराविक रक्कम मिळवण्यासाठी 'एसडब्ल्यूपी' हा सर्वोत्तम पर्याय आहे.
- सुरक्षित विड्रॉल मर्यादा : तज्ज्ञांनुसार, एकूण निधीच्या ४-५% रक्कम वार्षिक स्वरूपात काढणे सुरक्षित मानले जाते. ३ कोटींच्या निधीवर हे वर्षभरात साधारण १२-१५ लाख रुपये होतात. यामुळे तुमचा मूळ निधी पुढील २५ वर्षांपर्यंत टिकण्याची शक्यता वाढते.
वाचा - नोकरी आहे तोवरच विमा! कंपनीच्या मेडिक्लेमवर विसंबून राहणे धोक्याचे; नितीन कामथ सांगितले 'हे' कारण
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Maximize EPF benefits by understanding withdrawal rules. Diversify retirement portfolio beyond EPF with options like Senior Citizen Savings Scheme, debt funds, and equities for inflation-beating returns and financial security in later years.
Web Summary : निकासी नियमों को समझकर ईपीएफ लाभों को अधिकतम करें। वरिष्ठ नागरिक बचत योजना, ऋण फंड और इक्विटी जैसे विकल्पों के साथ ईपीएफ से परे सेवानिवृत्ति पोर्टफोलियो में विविधता लाएं, ताकि बाद के वर्षों में मुद्रास्फीति-हराने वाले रिटर्न और वित्तीय सुरक्षा सुनिश्चित हो सके।