Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्या-चांदीचे भविष्यात काय होणार? जागतिक अर्थतज्ज्ञाचा खळबळजनक इशारा; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 10:58 IST

Gold Rate : प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ पीटर शिफ यांनी यापूर्वी २००८ मध्ये जागतिक मंदी येणार असल्याचा इशारा दिला होता. आणि नंतर तो खराही ठरला. त्यामुळे त्यांच्या या बोलण्याचा महत्त्व आले आहे.

Gold Rate : सध्या सोन्याच्या दरात घसरण होत असताना आणि अमेरिकन डॉलर वधारत असताना अनेकांना वाटत आहे की सोन्याचे दिवस संपले. मात्र, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि 'युरो पॅसिफिक अ‍ॅसेट मॅनेजमेंट'चे संस्थापक पीटर शिफ यांनी दिलेला इशारा गुंतवणूकदारांची झोप उडवणारा आहे. "अमेरिकन डॉलरचे मूल्य पूर्णपणे मातीमोल होईल आणि त्याची जागा 'सोने' घेईल," असा खळबळजनक दावा शिफ यांनी केला आहे.

२००८ चे संकट यापुढे 'किरकोळ' ठरेल!पीटर शिफ यांनी 'फॉक्स बिझनेस'ला दिलेल्या मुलाखतीत जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल गंभीर भाकीत केले आहे. त्यांच्या मते, आगामी आर्थिक संकट इतके भीषण असेल की २००८ च्या जागतिक मंदीची तीव्रता त्यासमोर अगदीच किरकोळ वाटेल. "२००८ मध्ये संकट जगभर पसरले होते, पण यावेळी अमेरिकेची अंतर्गत व्यवस्थाच कोलमडण्याच्या उंबरठ्यावर आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉलरवरील विश्वास उडतोय?जगभरातील केंद्रीय बँका हळूहळू डॉलरवरील अवलंबित्व कमी करत असल्याचे निरीक्षण शिफ यांनी नोंदवले आहे. अनेक देश आता अमेरिकन 'ट्रेझरी बाँड्स' विकून सोन्याचा साठा वाढवण्याला प्राधान्य देत आहेत. जगभरातून अमेरिकेला मिळणारा पाठिंबा कमी होत असल्याने डॉलरचे वर्चस्व संपुष्टात येण्याची वेळ जवळ आली आहे.

सोन्या-चांदीचा 'रेकॉर्ड ब्रेक' आणि पडझडगेल्या महिन्यात सोन्याने ५,०८५ डॉलर्स आणि चांदीने १०८ डॉलर्सचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला होता. शिफ यांच्या मते, ही दरवाढ केवळ मागणीमुळे नव्हती, तर कागदी चलनावरील लोकांचा विश्वास उडाल्याचे ते लक्षण होते. गुरुवारी (५ फेब्रुवारी) चांदी १६ टक्क्यांनी आणि सोने ४ टक्क्यांनी घसरले. ही घसरण डॉलरच्या तात्पुरत्या मजबूतीमुळे आणि नफेखोरीमुळे झाली असली, तरी शिफ यांनी याकडे 'वादळापूर्वीची शांतता' म्हणून पाहण्याचा सल्ला दिला आहे.

पीटर शिफ यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे महाग पडेल?पीटर शिफ हे केवळ अर्थतज्ज्ञ नसून ते एक दूरदृष्टी असलेले फंड मॅनेजर आहेत.२००८ चे भाकीत : अमेरिकेतील हाऊसिंग क्षेत्रातील 'बबल' फुटेल, असे भाकीत त्यांनी २००८ मध्ये केले होते. तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले, पण शेवटी तेच खरे ठरले.चलनवाढीचा धोका : "खरे धन हे कागदी चलनाऐवजी सोने-चांदीसारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीत असते," असे ते नेहमी सांगतात.

वाचा - आज आरबीआयचा 'बडा फैसला'! रेपो रेट घटणार की कर्ज महागणार? गव्हर्नर संजय मल्होत्रा काय बोलणार?

गुंतवणूकदारांनी काय करावे?पीटर शिफ यांच्या मते, अमेरिकन अर्थव्यवस्थेची स्थिती सरकारने दाखवल्याप्रमाणे 'मजबूत' नसून ती पोकळ झाली आहे. गुंतवणूकदारांनी केवळ शेअर बाजारावर अवलंबून न राहता आपल्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा समावेश करून विविधता आणणे हिताचे ठरेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Gold and silver's future: Economist's warning about dollar's collapse.

Web Summary : Economist Peter Schiff warns the dollar's value will collapse, replaced by gold. He predicts a severe economic crisis dwarfing 2008, as central banks reduce dollar reliance and favor gold. Gold and silver's recent surge signals distrust in paper currency. Diversifying portfolios with gold is crucial.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूकटॅरिफ युद्धअमेरिका