Join us
Daily Top 2Weekly Top 5

Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 15:15 IST

Union Bank Investment Scheme: युनियन बँक ऑफ इंडिया ही केंद्र सरकारच्या अखत्यारित काम करणारी एक सरकारी बँक आहे. या बँकेची ही स्कीम तुम्हाला मालामाल करू शकते.

Union Bank Investment Scheme: युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) ही केंद्र सरकारच्या अखत्यारित काम करणारी एक सरकारी बँक आहे. या वर्षी आरबीआयनं रेपो रेटमध्ये १.०० टक्के कपात केली आहे, ज्यामुळे अनेक बँकांनी एफडीचे (Fixed Deposit) व्याजदर कमी केले होते. युनियन बँक ऑफ इंडियानेही रेपो रेट कमी झाल्यानंतर एफडीच्या व्याजदरात कपात केली होती.

तरीही, कपात होऊनही, सार्वजनिक क्षेत्रातील ही बँक एफडीवर उत्तम परतावा देत आहे. आज आम्ही तुम्हाला युनियन बँक ऑफ इंडियाच्या अशा एका स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये २ लाख रुपये जमा करून तुम्ही गॅरंटीसह ८५,०४९ रुपयांपर्यंत निश्चित व्याज मिळवू शकता.

मिळतंय ७.३५ टक्क्यांचं जबरदस्त व्याज

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये कमीत कमी ७ दिवस आणि जास्तीत जास्त १० वर्षांसाठी एफडी केली जाऊ शकते. युनियन बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना एफडीवर ३.४० टक्के ते ७.३५ टक्के पर्यंत व्याज देत आहे. ही सरकारी बँक ३ वर्षांच्या एफडी स्कीमवर सर्वात जास्त व्याज देत आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ३ वर्षांच्या एफडी स्कीमवर सामान्य नागरिकांना ६.६० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) ७.१० टक्के 0आणि सुपर ज्येष्ठ नागरिकांना (८० वर्षांवरील) ७.३५ टक्के व्याज मिळत आहे.

५ वर्षांच्या एफडीवर किती मिळतंय व्याज

ही बँक सामान्य नागरिकांना ५ वर्षांच्या एफडीवर ६.४० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ६.९० टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ७.१५ टक्के व्याज देत आहे. जर तुम्ही एफडीमध्ये ₹२,००,००० जमा केल्यास मिळेल ₹८५,०४९ पर्यंत निश्चित व्याज मिळेल. जर तुम्ही सामान्य नागरिक असाल आणि युनियन बँकेच्या ५ वर्षांच्या एफडीमध्ये २ लाख रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण २,७४,७२९ रुपये मिळतील, ज्यात ७४,७२९ रुपयांचे निश्चित व्याज समाविष्ट आहे.

जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि ५ वर्षांच्या एफडीमध्ये २ लाख रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण २,८१,५६८ रुपये मिळतील, ज्यात ८१,५६८ रुपयांचे निश्चित व्याज आहे. त्याचप्रमाणे, जर तुम्ही अति ज्येष्ठ नागरिक असाल, तर तुम्हाला ५ वर्षांच्या एफडीमध्ये २ लाख रुपये जमा केल्यावर मॅच्युरिटीवर एकूण २,८५,०४९ रुपये मिळतील, ज्यात ८५,०४९ रुपयांचे निश्चित व्याज समाविष्ट आहे. एफडी स्कीम अंतर्गत, मॅच्युरिटीवर तुम्हाला गॅरंटीसह व्याजाची निश्चित रक्कम मिळते.

English
हिंदी सारांश
Web Title : Union Bank FD Scheme: Deposit ₹2 Lakh, Earn Guaranteed High Interest

Web Summary : Union Bank offers attractive FD rates, up to 7.35% for senior citizens. Deposit ₹2 lakh for 3-5 years and earn guaranteed returns, with senior citizens earning up to ₹85,049 in interest.
टॅग्स :बँकगुंतवणूकपैसा