SBI Saving Schemes: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया, फिक्स्ड डिपॉझिट खात्यांवर उत्कृष्ट व्याज देत आहे. भारतीय स्टेट बँक आपल्या ग्राहकांना एफडी खात्यावर ३.०५ टक्क्यांपासून ते ७.०५ टक्क्यांपर्यंत व्याज ऑफर करत आहे. एसबीआयमध्ये किमान ७ दिवसांपासून ते कमाल १० वर्षांच्या कालावधीसाठी एफडी खातं उघडता येतं. बँकेच्या ताज्या माहितीनुसार, एका विशेष योजनेत केवळ १ लाख रुपये जमा करून ग्राहक ४२,५२४ रुपयांपर्यंतचं निश्चित व्याज मिळवू शकतात.
अमृत वृष्टी विशेष एफडी योजना
भारतीय स्टेट बँक आपल्या ४४४ दिवसांच्या 'अमृत वृष्टी' विशेष एफडी योजनेवर सर्वाधिक व्याज देत आहे. या योजनेअंतर्गत सामान्य नागरिकांना ६.४५ टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ६.९५ टक्के आणि अति-ज्येष्ठ नागरिकांना ७.०५ टक्के व्याज मिळत आहे. याशिवाय, ५ वर्षांच्या एफडी योजनेवर सामान्य नागरिकांना ६.०५ टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ७.०५ टक्के आणि अति-ज्येष्ठ नागरिकांना ७.१५ टक्के व्याजदर दिला जात आहे.
५ वर्षांत १० लाखांचा फंड हवाय; मग आजपासून किती करावी लागू शकते SIP? जाणून घ्या
१,००,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा
जर एखादा सामान्य नागरिक एसबीआयमध्ये ५ वर्षांच्या एफडीमध्ये १ लाख रुपये जमा करतो, तर त्याला मॅच्युरिटीवर एकूण १,३५,०१८ रुपये मिळतील, ज्यामध्ये ३५,०१८ रुपये व्याजाचा समावेश असेल. त्याचप्रमाणे, ज्येष्ठ नागरिकाने ५ वर्षांसाठी १ लाख रुपये गुंतवल्यास त्याला मॅच्युरिटीवर एकूण १,४१,८२६ रुपये मिळतील, ज्यामध्ये ४१,८२६ रुपये निश्चित व्याज असेल. सर्वात जास्त फायदा अति-ज्येष्ठ नागरिकांना होणार असून, १ लाख रुपयांच्या ५ वर्षांच्या एफडीवर त्यांना मॅच्युरिटीनंतर एकूण १,४२,५२४ रुपये मिळतील, म्हणजेच त्यांना ४२,५२४ रुपयांचे निश्चित व्याज मिळेल.
Web Summary : SBI offers attractive fixed deposit rates, up to 7.05%. Senior citizens can earn ₹42,524 fixed interest on a ₹1,00,000 five-year FD. The 'Amrit Varsha' scheme offers competitive rates for 444-day deposits.
Web Summary : एसबीआई फिक्स्ड डिपॉजिट पर शानदार ब्याज दरें दे रहा है, जो 7.05% तक हैं। वरिष्ठ नागरिक ₹1,00,000 की पांच साल की एफडी पर ₹42,524 निश्चित ब्याज अर्जित कर सकते हैं। 'अमृत वर्षा' योजना 444 दिनों की जमा पर प्रतिस्पर्धी दरें प्रदान करती है।