Join us

विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 13:56 IST

Gold Silver Price Today 22 November: लग्नसराईचा हंगाम असल्यानं सराफा बाजारात ग्राहकांची संख्या वाढली आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात तेजी ...

Gold Silver Price Today 22 November: लग्नसराईचा हंगाम असल्यानं सराफा बाजारात ग्राहकांची संख्या वाढली आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात तेजी दिसून आली, तर दुसरीकडे चांदीची चमक मात्र कमी  झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७२ रुपयांनी वाढून ७७,४०६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. चांदीच्या दरात आज ७०० रुपयांची घसरण झाली आहे. आज चांदी ९०,०५६ रुपयांवर उघडली. हे दर आयबीएनं जारी केलेले आहेत. यावर जीएसटीचा समावेश नाही. आज चांदीचा भाव ८८,९०४ रुपये प्रति किलो ग्रॅम वर खुला झाला. तुमच्या शहरात यात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो.

दिल्लीत दर काय?

लाइव्ह मिंटनुसार, दिल्लीत आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७८,१३३ रुपये झालाय. काल सोन्याचा भाव ७७,२५३ रुपये होता. तर गेल्या आठवड्यात १६ नोव्हेंबरला सोन्याचा भाव ७५,९४३ रुपये प्रति १० ग्रॅम होता. दिल्लीत आज चांदीचा भाव ९५ हजार रुपये किलो इतका झालाय. गेल्या आठवड्यात हा भाव ९२,५०० रुपये किलो होता.

चेन्नईत दर काय?

चेन्नईत आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७७,९८१ रुपये झालाय. गुरुवारी सोन्याचा भाव ७७,१०१ रुपये प्रति १० ग्रॅम होता तर गेल्या आठवड्यात तो ७५,७९१ रुपये होता. चांदीचा भाव मात्र १,०३,६०० रुपये प्रति किलो झालाय. काल चांदीचा दर १,०३,८०० रुपये प्रति किलो होता. तर गेल्या आठवड्यात तो १,०१,६०० रुपये होता.

मुंबईत सोन्याचा दर

आज मुंबईत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७७,९८७ रुपये झालाय. गुरुवारी सोन्याचा भाव ७७,१०७ रुपये होता तर गेल्या आठवड्यात तो ७५,७९७ रुपये होता. मुंबईत आज चांदीचा भाव ९४,३०० रुपये प्रति किलो झालाय. काल चांदीचा दर ९४ हजार रुपये होता.

टॅग्स :सोनंचांदी