Bank of Baroda FD : शेअर बाजारातील अस्थिरतेच्या काळात आजही अनेक गुंतवणूकदार सुरक्षित आणि खात्रीशीर परताव्यासाठी मुदत ठेव योजनेला पसंती देतात. जर तुम्ही सुरक्षिततेसोबतच चांगल्या परताव्याच्या शोधात असाल, तर 'बँक ऑफ बडोदा'ची ५ वर्षांची एफडी योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अधिक लाभदायी आहे.
बँक ऑफ बडोदा: सध्याचे व्याजदरबँकेने वेगवेगळ्या वयोगटातील ग्राहकांसाठी आकर्षक व्याजदर निश्चित केले आहेत.सामान्य नागरिक : ६.३०% प्रति वर्ष.ज्येष्ठ नागरिक : ६.९०% प्रति वर्ष.अति ज्येष्ठ नागरिक : ७.००% प्रति वर्ष.(टीप: ३ वर्षांहून अधिक आणि ५ वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी हे दर लागू आहेत.)
५ लाखांच्या गुंतवणुकीवर किती मिळणार परतावा?बँक ऑफ बडोदामध्ये व्याजाची गणना 'त्रैमासिक चक्रवाढ' पद्धतीने केली जाते. म्हणजेच दर ३ महिन्यांनी तुमच्या मुदलात व्याज जमा होते.१. सामान्य नागरिक (व्याजदर ६.३०%):गुंतवणूक : ५,००,००० रुपयेमिळालेले एकूण व्याज : १,८३,४५० रुपयेमॅच्युरिटी रक्कम : ६,८३,४५० रुपये
२. ज्येष्ठ नागरिक (व्याजदर ६.९०%)मिळालेले एकूण व्याज : २,०३,९२१ रुपयेमॅच्युरिटी रक्कम : ७,०३,९२१ रुपये
३. अति ज्येष्ठ नागरिक (व्याजदर ७.००%):मिळालेले एकूण व्याज : २,०७,३८९ रुपयेमॅच्युरिटी रक्कम : ७,०७,३८९ रुपये
एफडी वरील व्याजावर 'कर' किती?
- मुदत ठेवीतून मिळणारे उत्पन्न हे पूर्णपणे करमुक्त नसते. त्याबाबतचे नियम खालीलप्रमाणे आहेत.
- इन्कम टॅक्स स्लॅब: एफडीमधून मिळणारे व्याज तुमच्या एकूण उत्पन्नात जोडले जाते आणि तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार त्यावर कर आकारला जातो.
- ज्येष्ठ नागरिकांना सवलत: 'कलम 80TTB' अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवरील ५०,००० रुपयांपर्यंतच्या व्याजावर कर सवलत मिळते (जुनी कर रचना निवडल्यास).
- कलम 80C: ५ वर्षांच्या टॅक्स सेव्हर एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर वजावट मिळते.
Web Summary : Bank of Baroda's fixed deposit scheme offers attractive returns, especially for senior citizens. Investments of ₹5 lakhs can yield up to ₹7 lakhs in five years, with higher interest rates for senior and super senior citizens. Tax benefits are also available.
Web Summary : बैंक ऑफ बड़ौदा की सावधि जमा योजना वरिष्ठ नागरिकों के लिए आकर्षक रिटर्न प्रदान करती है। ₹5 लाख के निवेश पर पांच वर्षों में ₹7 लाख तक मिल सकते हैं, वरिष्ठ और अति वरिष्ठ नागरिकों के लिए उच्च ब्याज दरें हैं। कर लाभ भी उपलब्ध हैं।