Bank of Baroda :शेअर बाजारातील अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देणारा गुंतवणूक पर्याय म्हणून 'फिक्स्ड डिपॉझिट'कडे पाहिले जाते. सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज बँक ऑफ बडोदा सध्या ५ वर्षांच्या एफडीवर आकर्षक व्याजदर देत आहे. जर तुम्ही ५ लाख रुपयांची गुंतवणूक ५ वर्षांसाठी केली, तर तुम्हाला व्याजापोटी २ लाख रुपयांहून अधिक नफा मिळू शकतो.
व्याजदरांचे सविस्तर गणितबँकेने वेगवेगळ्या वयोगटातील ग्राहकांसाठी व्याजाचे दर खालीलप्रमाणे निश्चित केले आहेत.
- सामान्य ग्राहक : ३ वर्षांहून अधिक आणि ५ वर्षांपर्यंतच्या एफडीवर ६.३०% व्याज.
- ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांवरील) : या ग्राहकांसाठी ६.९०% व्याज दर लागू आहे.
- अति ज्येष्ठ नागरिक (८० वर्षांवरील) : या गटातील गुंतवणूकदारांना सर्वाधिक ७.००% व्याज दिले जात आहे.
५ लाखांच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल?
| ग्राहक प्रवर्ग | गुंतवणुकीची रक्कम | ५ वर्षांनंतरचे व्याज | एकूण मॅच्युरिटी रक्कम |
| सामान्य नागरिक | ५,००,००० | १,८३,४५० | ६,८३,४५० |
| ज्येष्ठ नागरिक | ५,००,००० | २,०३,९२१ | ७,०३,९२१ |
| अति ज्येष्ठ नागरिक | ५,००,००० | २,०७,३८९ | ७,०७,३८९ |
एफडीमध्ये गुंतवणुकीचे फायदे
- खात्रीशीर परतावा: बाजारातील चढ-उतारांचा एफडीवर कोणताही परिणाम होत नाही, त्यामुळे तुमचा परतावा निश्चित असतो.
- सुरक्षित गुंतवणूक: सरकारी बँक असल्याने तुमचे भांडवल पूर्णपणे सुरक्षित राहते.
- ज्येष्ठ नागरिकांना झुकते माप: वयानुसार वाढीव व्याजदराचा लाभ मिळत असल्याने सेवानिवृत्त व्यक्तींसाठी हा उत्पन्नाचा उत्तम स्रोत आहे.
वाचा - आयटी वगळता सर्वत्र तेजी! टाटा स्टील आणि महिंद्राची दमदार कामगिरी; गुंतवणूकदारांनी कमावले ३ लाख कोटी
एफडीवर मिळणारे व्याज हे करपात्र असू शकते. त्यामुळे कर सवलतीसाठी तुम्ही ५ वर्षांची 'टॅक्स सेव्हर एफडी' देखील निवडू शकता, ज्यामध्ये ८०सी अंतर्गत वजावट मिळते.
Web Summary : Bank of Baroda offers attractive FD rates, yielding over ₹2 lakh interest on a ₹5 lakh, 5-year investment. Senior citizens get higher rates. Secure returns, safe investment, and tax benefits available.
Web Summary : बैंक ऑफ बड़ौदा 5 साल के एफडी पर आकर्षक ब्याज दर प्रदान करता है, ₹5 लाख के निवेश पर ₹2 लाख से अधिक ब्याज मिलता है। वरिष्ठ नागरिकों को उच्च दरें मिलती हैं। सुरक्षित रिटर्न, सुरक्षित निवेश और कर लाभ उपलब्ध।