Join us

PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 15:16 IST

EPFO 2.0 News : केंद्र सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी (EPFO) संबंधित काही महत्त्वाचे बदल करण्याच्या तयारीत आहे. आता सरकार ईपीएफओ ३.० योजना जाहीर करण्याच्या विचारात आहे.

EPFO 2.0 News : केंद्र सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी (EPFO) संबंधित काही महत्त्वाचे बदल करण्याच्या तयारीत आहे. आता सरकार ईपीएफओ ३.० योजना जाहीर करण्याच्या विचारात आहे, ज्यामध्ये ग्राहकांसाठी अनेक नवीन सुविधा आणल्या जातील. याअंतर्गत एटीएमचा पर्यायही दिला जाऊ शकतो.

काय आहे प्लॅन?

सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार, ईपीएफओ ग्राहकांना एटीएमचा वापर करून थेट पीएफ काढण्याचा पर्याय मिळू शकतो. एटीएमद्वारे पीएफ काढता यावा यासाठी कामगार मंत्रालय कार्ड जारी करण्याचे काम करत असल्याचं वृत्त आहे. मे-जून २०२५ पर्यंत ही सुविधा कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे ईपीएफओ ग्राहकांना आणखी दिलासा मिळेल.

हाही प्रस्ताव

याशिवाय ईपीएफओ भविष्य निर्वाह निधीतील (पीएफ) कर्मचाऱ्यांच्या योगदानावरील १२ टक्क्यांची मर्यादा काढून टाकू शकते. अहवालात असंही म्हटलंय की, कर्मचाऱ्यांना लवकरच त्यांच्या बचत प्राधान्यानुसार त्यांच्या पीएफ खात्यात योगदान देण्याची सुविधा मिळू शकते. या योजनेत सध्याच्या मर्यादेपेक्षा जास्त ठेवींवर ही परवानगी दिली जाऊ शकते. मात्र, हा प्रस्ताव प्राथमिक चर्चेच्या टप्प्यात आहे.

कोणाचे योगदान किती?

सध्या ईपीएफओ सदस्यांच्या पगाराच्या १२ टक्के रक्कम (बेसिक पे अँड महागाई भत्ता) ईपीएफ खात्यात जाते. नियोक्त्याच्या १२ टक्के योगदानापैकी ८.३३ टक्के रक्कम ईपीएस-९५ मध्ये आणि उर्वरित ३.६७ टक्के रक्कम ईपीएफ खात्यात जमा होते.

सामाजिक सुरक्षेचे फायदे सुधारण्याबरोबरच नरेंद्र मोदी सरकार देशात रोजगार निर्मितीवरही भर देत आहे, असं सूत्रांनी सांगितलं. नुकतेच कामगार मंत्रालयाने ईपीएफओला एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव (ईएलआय) योजना सुरू करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि क्षमता वाढीच्या तयारीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलंय.

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीसरकार