8th Pay Commission Latest News: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत महत्त्वाची हालचाल सुरू झाली आहे. National Council (Joint Consultative Machinery) च्या ड्राफ्टिंग कमिटीची येत्या १३ एप्रिल २०२६ रोजी महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत ८व्या वेतन आयोगाला पाठविण्यात येणाऱ्या अंतिम प्रस्तावावर चर्चा केली जाणार आहे.
केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक वेतनवाढीच्या निर्णयाची प्रतीक्षा करत असल्याने या बैठकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. या बैठकीतून तयार होणारा प्रस्ताव पुढील वेतनरचनेवर मोठा परिणाम करू शकतो.
दरम्यान, ड्राफ्टिंग कमिटी वेतन, पेन्शन आणि सेवा अटींशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करत असून, या सर्वांचा समावेश असलेले एक संयुक्त मेमोरँडम तयार करण्यात येत आहे. हा प्रस्ताव ८वा केंद्रीय वेतन आयोग यांच्याकडे सादर केला जाणार आहे. यापूर्वी १२ मार्च २०२६ रोजी झालेल्या बैठकीत विविध कर्मचारी आणि पेन्शनर्स संघटनांच्या सूचनांवर विचार करण्यात आला होता. त्याच आधारे अंतिम मसुदा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.
केंद्र सरकारने फेब्रुवारी २०२६ मध्ये संसदेत दिलेल्या माहितीनुसार, ८व्या वेतन आयोगाची अधिसूचना आधीच काढण्यात आली आहे. आयोगाला गठनानंतर १८ महिन्यांच्या आत शिफारसी सादर करण्याची मुदत देण्यात आली असून, वेतन, भत्ते, पेन्शन आणि इतर लाभांबाबत सूचना देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळेच २०२७ पर्यंत आयोग लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मुख्य आधार असलेल्या फिटमेंट फॅक्टरवरही सर्वांचे लक्ष आहे. कर्मचारी संघटनांनी हा फॅक्टर ३.२५ किंवा त्याहून अधिक ठेवण्याची मागणी केली आहे. मात्र, प्रत्यक्ष वेतनवाढ किती होईल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. एकूणच, १३ एप्रिलची बैठक ही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणार असून, या बैठकीतून पुढील वेतनवाढीचा मार्ग स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Web Summary : Central employees await the April 13th meeting regarding the 8th Pay Commission. Discussions will focus on the final proposal for salary increases and pension revisions, potentially impacting future pay structures. The fitment factor is also a key point of interest.
Web Summary : 8वें वेतन आयोग को लेकर 13 अप्रैल को अहम बैठक है। केंद्रीय कर्मचारी वेतन वृद्धि का इंतजार कर रहे हैं। वेतन वृद्धि और पेंशन संशोधन पर अंतिम प्रस्ताव पर चर्चा की जाएगी, जिससे भविष्य के वेतन ढांचे पर असर पड़ सकता है। फिटमेंट फैक्टर भी एक महत्वपूर्ण मुद्दा है।