सध्या लोकांना हॉटेलमधील खाद्यपदार्थ थेट घरीच मागवून खाण्यास आवडते. फूड डिलिव्हरी कंपन्यांद्वारे लोक बाहेरून खाद्यपदार्थ घरीच किंवा ऑफिसमध्ये मागवतात आणि आरामात ते खाण्याचा आनंद घेतात. याशिवाय, फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या नवीन ऑफर्समुळे ग्राहकांसाठी खाद्यपदार्थांच्या किमती आणखी कमी होतात, ज्यामुळे ग्राहकांच्या खिशावरचा भार कमी होतो आणि त्यांना घरबसल्या स्वादिष्ट जेवणही मिळते.
फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने (Zomato) आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. आता ग्राहक झोमॅटो गोल्ड मेंबरशिप फक्त 30 रुपयांमध्ये घेऊ शकतात. या मेंबरशिपअंतर्गत, ग्राहकांना 6 महिन्यांसाठी अनेक शानदार लाभ मिळतील. ज्यामध्ये फ्री डिलिव्हरी, आकर्षक डिस्काउंट आणि विशेष ऑफर्स यांचा समावेश आहे. ही ऑफर ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान आणण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त आणि सोयीस्कर फूड डिलिव्हरीचा अनुभव मिळू शकतो.
झोमॅटो गोल्ड मेंबरशिप अंतर्गत, ग्राहक 7 किलोमीटरच्या परिसरात 200 रुपयांपेक्षा जास्त ऑर्डरवर फ्री डिलिव्हरीचा लाभ घेऊ शकतात. झोमॅटोच्या डिलिव्हरी नेटवर्कमध्ये समाविष्ट असलेल्या रेस्टॉरंट्सना ही सुविधा लागू होईल. याशिवाय, ग्राहक या प्लॅनद्वारे विशेष ऑफर आणि डिस्काउंटचा देखील लाभ घेऊ शकतात. जर एखाद्या ग्राहकाकडे आधीच झोमॅटो गोल्ड मेंबरशिप असेल, तर तो हा प्लॅन खरेदी करून त्याच्या सध्याच्या मेंबरशिपची वैधता 6 महिन्यांनी वाढवू शकतो. जुन्या प्लॅनची मुदत संपल्यानंतर नवीन प्लॅन आपोआप अॅड केला जाईल, त्यामुळे ग्राहकांना सुविधा मिळत राहतील.
ब्लॅक फ्रायडे सेलच्या निमित्ताने खास डिस्काउंटझोमॅटोची ही ऑफर ब्लॅक फ्रायडे सेलच्या निमित्ताने सादर करण्यात आली आहे. या अंतर्गत, ग्राहकांना देशभरातील 20,000 हून अधिक पार्टनर रेस्टॉरंटमधून ऑर्डर केल्यावर 30 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकते. ही सुविधा फक्त त्या शहरांमध्ये उपलब्ध असेल जिथे झोमॅटोच्या डिलिव्हरी नेटवर्कशी जोडलेली रेस्टॉरंट्स आहेत.दरम्यान, झोमॅटोची ही ऑफर अशा ग्राहकांसाठी उत्तम आहे, जे नियमितपणे फूड डिलिव्हरी करतात.