Join us

मोठा निर्णय! Zomato चे नाव बदलले; आता 'या' नावाने ओळखले जाणार, बोर्डाची मान्यता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 19:02 IST

Zomato Eternal: कंपनीच्या संचालक मंडळाने Zomato चे नाव बदलण्यास मान्यता दिली आहे.

Zomato Eternal: फूड डिलिव्हरी अॅप Zomato संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. संचालक मंडळाने कंपनीचे नाव बदलण्यास मान्यता दिली आहे. कंपनीचे नवीन नाव इटर्नल लिमिटेड करण्यात आले आहे. या निर्णयाला कंपनीच्या संचालक मंडळाने मान्यता दिली असून आता ते भागधारकांच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे.

झोमॅटोने काही काळापूर्वी ब्लिंकिटचे अधिग्रहण केले होते. यासह कंपनीचा व्यवसाय वाढला आहे. अशा परिस्थितीत, कंपनीने निर्णय घेतला की, इटर्नल नावाखाली इतर कंपन्या आणण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, झोमॅटो आता फक्त रेस्टॉरंट लिस्टिंग प्लॅटफॉर्म नाही, तर डिलिव्हरी, ग्रॉसरी, हायपरप्युअर आणि क्विक-कॉमर्स यांसारख्या अनेक क्षेत्रांत काम करत आहे.

काय बदलणार?

कंपनीचे नाव: Zomato Ltd. →इटरनल लि.वेबसाइट: zomato.com → eternal.comस्टॉक टिकर: ZOMATO → ETERNALमुख्य व्यवसाय: Zomato, Blinkit, District, Hyperpure

इटर्नल नावाचा अर्थ काय आहे?दीपंदर गोयल यांच्या मते, ‘इटर्नल’ हे फक्त नाव नसून एक मिशन स्टेटमेंट आहे. याचा अर्थ कंपनी केवळ वर्तमानातच नाही तर भविष्यातही अस्तित्वात राहील.

कंपनीच्या ग्राहकांवर काय परिणाम होईल?Zomato आणि BlinkIt सारखे ब्रँड पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहतील. ग्राहकांची गैरसोय होणार नाही. 

झोमॅटोची सुरुवात कशी झाली?दीपेंदर गोयल हे Zomato चे संस्थापक आहेत. त्यांनी 17 वर्षांपूर्वी 2007 मध्ये "Foodiebay" नावाने ही कंपनी सुरू केली होती. त्यावेळी फक्त रेस्टॉरंट्सचे मेनू ऑनलाइन अपलोड केले जायचे, परंतु नंतर त्याचे मोठ्या कंपनीत रुपांतर झाले.

टॅग्स :झोमॅटोव्यवसायगुंतवणूक