Join us  

Zomato च्या दीपिंदर गोयल यांनी केलं मॅक्सिकन मॉडेलशी लग्न, पाहा कोण आहे ग्रेसिया मुनोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 11:01 AM

Zomato Deepinder Goyal Marriage : फूड डिलिव्हरी ॲप झोमॅटोचे संस्थापक दीपंदर गोयल यांनी मॅक्सिन मॉडेल ग्रेशिया मुनोझशी विवाह केल्याची माहिती समोर आली आहे.

फूड डिलिव्हरी ॲप झोमॅटोचे (Zomato) संस्थापक दीपंदर गोयल (Deepinder Goyal) यांनी मॅक्सिन मॉडेल ग्रेशिया मुनोझशी (Grecia Munoz) विवाह केल्याची माहिती समोर आली आहे. मुनोज आणि दीपंदर फेब्रुवारीमध्ये त्यांच्या हनीमूनवरून परतले. हा खुलासा दोघांपैकी एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर केला. ग्रेशिया मुनोझ हीच्या इंस्टाग्राम बायोनुसार, ती आता तिच्या भारतातल्या घरी आहे.  

कोण आहे ग्रेशिया मुनोझ? 

जानेवारीमध्ये ग्रेशिया मुनोझने दिल्लीतील प्रसिद्ध ठिकाणांना भेट दिली आणि तिथले फोटोही शेअर केले होते. इंस्टाग्राम बायोनुसार, २०२२ मध्ये अमेरिकेच्या मेट्रोपॉलिटन फॅशन वीकची विजेता मुनोझनं गोयल यांच्याशी दुसरा विवाह केला आहे. 

गुरुग्राममध्ये राहणारे ४१ वर्षीय दीपिंदर गोयल यांनी कन्सल्टींग फर्म बेन अँड कंपनीतील आपली नोकरी सोडल्यानंतर २००८ मध्ये रेस्तराँ अॅग्रीगेटर आणि फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो (आधीची Foodiebay.com) को-फाऊंड केली होती. या आठवड्यात गोयल आणि झोमॅटो 'प्युअर व्हेज मोड' आणि 'प्युअर व्हेज फ्लीट' वरून चर्चेत आले होते. फक्त शाकाहारी जेवण देण्यासाठी वेगळ्या हिरव्या युनिफॉर्मवरून त्यांना मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. 

कंपनी आपल्या डिलिव्हरी एजंट्स आणि ग्रीन बॉक्ससाठी ग्रीन ड्रेस कोडची योजना मागे घेईल आणि सर्व डिलिव्हरी एजंट सध्याचे लाल शर्ट किंवा टी-शर्ट हा युनिफॉर्म कायम ठेवतील, असं नंतर गोयल म्हणाले. तीन वर्षांपूर्वी झोमॅटो शेअर बाजारात लिस्ट झाली, त्यानंतर गोयल देशातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक ठरले. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार झोमॅटोत त्यांच्या हिस्स्याची किंमत ६५० मिलियन डॉलर्स इतकी झाली आहे.

टॅग्स :झोमॅटोलग्न