Join us

YouTube Shorts Income: युट्यूब शॉर्ट्स बनवून किती कमाई करू शकता? १००० सबस्क्रायबर्सवर किती मिळतात पैसे? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 15:53 IST

YouTube Shorts Income Per Views: जर तुम्हालाही व्हिडीओ बनवण्याची आवड असेल आणि तुम्हाला तुमच्या क्रिएटिव्हिटीतून पैसे कमवायचे असतील, तर युट्यूब शॉर्ट्स तुमच्यासाठी मोठी कमाईची संधी आहे.

YouTube Shorts Income Per Views: आजकाल युट्यूब शॉर्ट्स खूप चर्चेत आहेत. छोटे व्हिडीओ बनवून लोक लाखों रुपये कमवत आहेत. जर तुम्हालाही व्हिडीओ बनवण्याची आवड असेल आणि तुम्हाला तुमच्या क्रिएटिव्हिटीतून पैसे कमवायचे असतील, तर युट्यूब शॉर्ट्स तुमच्यासाठी मोठी कमाईची संधी आहे. पण, शॉर्ट्समधून पैसे कसे कमवायचे आणि त्यासाठी किती व्ह्यूज लागतात, हा प्रश्न आहे.

सर्वात आधी, युट्यूब शॉर्ट्समधून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला युट्यूब पार्टनर प्रोग्रामचा भाग व्हावं लागेल. यासाठी काही अटी आहेत:

१००० सबस्क्राइबर्सपासून कमाई होऊ शकते

तुमच्या चॅनलवर कमीतकमी १००० सबस्क्रायबर्स असणं आवश्यक आहे. यासोबतच, मागील १२ महिन्यांत ४००० तासांचा पब्लिक वॉच टाईम असावा किंवा मागील ९० दिवसांत तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओवर १ कोटी व्ह्यूज असावेत.

SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?

जर तुमच्याकडे १००० सबस्क्रायबर्स नसतील, तरीही काही संधी आहेत. त्यासाठी ५०० सबस्क्रायबर्स, मागील ९० दिवसांत ३ पब्लिक व्हिडीओ अपलोड आणि ३००० तासांचा पाहण्याचा वेळ किंवा ३० लाख शॉर्ट्स व्ह्यूज असणं आवश्यक आहे. या अटी पूर्ण झाल्यावरच तुम्ही मोनेटायझेशनसाठी अर्ज करू शकता.

युट्यूब शॉर्ट्समधून पैसे कसे कमवायचे?

पैसे कमवण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी

१. सर्वप्रथम युट्यूबवर साइन इन करा.

२. नंतर तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर क्लिक करून युट्यूब स्टुडिओमध्ये जा. ३

. तिथे डाव्या बाजूला 'Earn' पर्यायावर क्लिक करा. जर तुम्ही पात्र असाल, तर 'Apply' बटन दिसेल.

४. पात्र नसल्यास, 'Get Notified' वर क्लिक करून आवश्यक अटी पूर्ण करा.

५. यानंतर 'Start' वर क्लिक करून युट्यूबच्या अटी वाचा आणि 'Accept' करा.

६. त्यानंतर तुम्हाला तुमचे ॲडसेन्स खातं लिंक करावे लागेल. जर ॲडसेन्स खातं नसेल, तर नवीन बनवा.

७. यानंतर युट्यूब तुमच्या अर्जाची तपासणी करेल, ज्यात एक महिन्यापर्यंत वेळ लागू शकतो.

८. मंजुरी मिळाल्यावर स्टुडिओमध्ये जाऊन शॉर्ट्स मोनेटायझेशन मॉड्यूल स्वीकारा.

युट्यूब शॉर्ट्सवर व्ह्यूजवर पैसे कसे मिळतात?

युट्यूब शॉर्ट्सचा ॲड रेव्हेन्यू शेअरिंग प्रोग्राम तुमच्या व्हिडीओवर आलेल्या व्ह्यूजच्या आधारावर पैसे देतो. शॉर्ट्सच्या मध्ये चालणाऱ्या जाहिरातीतून जी कमाई होते, त्याचा एक भाग क्रिएटर्सना मिळतो. उर्वरित भाग म्युझिक लायसन्स यांसारख्या गोष्टींमध्ये जातो. एका क्रिएटरला एकूण कमाईपैकी ४५ टक्के हिस्सा मिळतो.

रक्कमेबद्दल बोलायचं झाल्यास, १००० व्ह्यूजवर ०.०५ ते ०.०७ डॉलर म्हणजेच सुमारे ४ ते ६ रुपये मिळू शकतात. जर तुमच्या शॉर्ट्सला १ मिलियन (१० लाख) व्ह्यूज आले, तर ५०-७० डॉलर म्हणजेच ४०००-६००० रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकते.

याव्यतिरिक्त, युट्यूबच्या सुपर थँक्स (Super Thanks) फीचरद्वारेही पैसे मिळतात. हे तुमच्या सबस्क्रायबर्सनी तुमच्या कॉन्टेंटला पसंत केल्यास दिलेली 'टीप' असते. परंतु लक्षात ठेवा, शॉर्ट्समधून मिळणारी कमाई लाँग व्हिडिओच्या तुलनेत कमी असू शकते. तरीही, जर तुम्ही व्हायरल शॉर्ट्स बनवले... जसं की मजेदार, भावनिक किंवा ट्रेंडिंग कंटेंट तर व्ह्यूज सहजपणे कोट्यवधींपर्यंत पोहोचू शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : YouTube Shorts Income: How much can you earn? Details here.

Web Summary : YouTube Shorts offer income potential. To monetize, meet subscriber and view requirements. Earnings vary based on views, with 1 million views potentially yielding $50-70. Super Thanks provides extra income.
टॅग्स :यु ट्यूबपैसा