Join us

भाड्याने राहणे चांगले की घर खरेदी करणं चांगले? Zerodha चे सहसंस्थापक म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 13:39 IST

सध्या घरं खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागत आहे.

सध्या सर्वसामान्य लोकांना घरं खरेदी करणं खूप अवघड झालं आहे, घरांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे अनेकजण घरं खरेदी न करता भाड्याच्या घरात राहण पसंत करतात. आता यावर Zerodha चे सहसंस्थापक निखिल कामथ यांनी सल्ला दिला आहे. सेंट्रल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ करूनही भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा स्वतःचे घर घेणे चांगले, असा सल्ला झिरोधाचे सहसंस्थापक कामथ यांनी दिला आहे. कामत म्हणाले की, भारतात घरभाड्यात अचानक वाढ झाली आहे. 

संजय राऊत घेणार सत्यपाल मलिकांची भेट; म्हणाले, “ते महत्त्वाचे नेते, देशाची सुरक्षा...”

Zerodha च्या सह-संस्थापकाने गुरुवारी ट्विट करुन सांगितले की, समतोल साधण्यासाठी मला घराच्या किमती आणि भाडे घटण्यावर पैज लावायची असेल, तर माझी बाजी अजूनही पूर्वीचीच आहे. भारतातील वाढत्या घरांच्या भाड्यांमागील मुख्य कारण म्हणजे कोविडनंतर राहण्याच्या जागेची मागणी आणि पुरवठा यांच्यातील प्रचंड विसंगती.

निखिल कामत यांच्या ट्विटमध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार, महामारीनंतर भाड्याच्या मागणीत अचानक झालेल्या वाढीची पूर्तता करण्यासाठी मेट्रो शहरांमध्ये पुरेसा घरांचा पुरवठा नाही. बेंगळुरूसारख्या शहरात, सामान्य 1BHK फ्लॅटचे घरभाडे गेल्या एका वर्षात ५७ टक्क्यांनी वाढले आहे. प्रमुख आयटी कंपन्यांसह इतर कंपन्यांकडून कार्यालयातून कामाची अंमलबजावणी हे याचे कारण आहे.

भाड्याच्या जागेच्या मागणीच्या तुलनेत, न विकल्या गेलेल्या निवासी मालमत्तांची संख्या आठ वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे. दुसरीकडे गेल्या वर्षीही निवासी मालमत्तांना दशकभर जास्त मागणी दिसून आली आहे. अॅनारॉक रिसर्चच्या अहवालात असे म्हटले आहे की, गेल्या वर्षीपासून बहुतेक मोठ्या शहरांमध्ये भाड्याची सरासरी किंमत दुहेरी अंकांमध्ये वाढली आहे.

टॅग्स :व्यवसायसुंदर गृहनियोजनबँक