Join us

देशातील सर्वात श्रीमंत राज्य कोणतं? GDP आणि GSDP आकडेवारी समोर, महाराष्ट्र कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 16:56 IST

year ender 2024 : देशाची आर्थिक राजधानी मानला जाणारा महाराष्ट्र २०२४ मध्ये सर्वात श्रीमंत राज्य राहिले. त्याचे अंदाजे सकल राज्य देशांतर्गत उत्पादन (GSDP) ४२.६७ लाख कोटी रुपये होते.

year ender 2024 : २०२४ वर्ष संपायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. यंदाचं वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आणि यशस्वी वर्ष ठरले. या वर्षी, भारताने ८.२% जीडीपी वाढ नोंदवली, जी सरकारच्या ७.३% च्या अंदाजित विकास दरापेक्षा जास्त होती. यासह भारताचा जीडीपी ४७.२४ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या कामगिरीमुळे जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताचे स्थान आणखी मजबूत झाले. देशाच्या उभारणीत प्रत्येक राज्याचा भरीव वाटा आहे. 

देशातील सर्वात श्रीमंत राज्यविविधतेने नटलेल्या देशात २८ राज्ये, ८ केंद्रशासित प्रदेश आणि एका राजधानीचा समावेश आहे. ही आपल्या देशाची ताकद आहे. यापैकी काही राज्ये केवळ प्रादेशिकच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरही आर्थिक विकासाची मुख्य केंद्रे म्हणून उदयास आली आहेत. जीडीपी आणि जीएसडीपीच्या आधारावर महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटक या वर्षी सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये होते.

महाराष्ट्र सर्वात श्रीमंत राज्यदेशाची आर्थिक राजधानी मानला जाणारा महाराष्ट्र २०२४ मध्ये सर्वात श्रीमंत राज्य राहिला. त्याचे अंदाजे सकल राज्य देशांतर्गत उत्पादन (GSDP)४२.६७ लाख कोटी रुपये होते, जे राष्ट्रीय GDP च्या १३.३% आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक बळाचा एक मोठा भाग आर्थिक सेवा, उद्योग आणि चित्रपट उद्योगातून येतो. मुंबई, राज्याची राजधानी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज यासारख्या वित्तीय संस्थांचे घर आहे. रिलायन्स आणि टाटा सारख्या कंपन्यांचे मुख्यालय देखील इतर राज्यांपेक्षा वेगळे बनवते.

तामिळनाडू दुसऱ्या स्थानावर'आशियाचे डेट्रॉईट' म्हणून ओळखले जाणारे तामिळनाडू ३१.५५ लाख कोटी रुपयांच्या GSD Pसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑटोमोबाईल, टेक्सटाईल आणि माहिती तंत्रज्ञान यासारख्या उद्योगांचे अर्थव्यवस्थेत मोठे योगदान आहे. तामिळनाडूचा दरडोई जीडीपी ३.५० लाख रुपये (आर्थिक वर्ष २०२३-२४) होता, ज्यामुळे दरडोई उत्पन्नाच्या बाबतीतही ते एक मजबूत राज्य बनते.

कर्नाटक तिसऱ्या स्थानावर२८.०९ लाख कोटी रुपयांच्या जीएसडीपीसह कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय जीडीपीमध्ये ते ८.२% योगदान देते. भारताची "सिलिकॉन व्हॅली" म्हणून ओळखले जाणारे बंगळुरू हे राज्यासाठी आर्थिक शक्तीचे मुख्य स्त्रोत आहे. हे राज्य माहिती तंत्रज्ञान, स्टार्टअप्स आणि इनोव्हेशनमध्ये आघाडीवर आहे.

गुजरात चौथ्या स्थानावरगुजरात २७.९ लाख कोटी रुपयांच्या जीएसडीपीसह चौथ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय जीडीपीमध्ये ते ८.१% योगदान देते. हे राज्य मजबूत औद्योगिक पाया आणि व्यावसायिक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. हे राज्य पेट्रोकेमिकल्स, टेक्सटाइल आणि डायमंड पॉलिशिंग सारख्या क्षेत्रात अग्रेसर आहे.

उत्तर प्रदेश पाचव्या क्रमांकावरभारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य, उत्तर प्रदेश, २४.९९ लाख कोटी रुपयांच्या GSDP आणि ८.४% च्या राष्ट्रीय GDP योगदानासह पाचव्या क्रमांकावर आहे. राज्याचे दरडोई उत्पन्न केवळ ०.९६ लाख रुपये आहे, जे इतर सर्वोच्च राज्यांपेक्षा कमी आहे.

या यादीत आणखी कोणती राज्ये?पश्चिम बंगाल : १८.८ लाख कोटी GSDP आणि ५.६% राष्ट्रीय योगदानासह सहाव्या क्रमांकावर आहे.

तेलंगणा : १६.५ लाख कोटी रुपयांचे GSDP आणि ४.९% योगदान असलेले वेगाने विकसित होत असलेले राज्य या यादीत ८ व्या क्रमांकावर आहे.

आंध्र प्रदेश : १५.८९ लाख कोटी GSDP आणि ४.७% योगदानासह ९व्या क्रमांकावर आहे.

दिल्ली : भारताची राजधानी दिल्लीने ११.०७ लाख कोटी रुपयांचा GSDP नोंदवला गेला. राष्ट्रीय जीडीपीमध्ये ते ३.६% योगदान देते.

भविष्यातील शक्यताS&P ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सनुसार, भारताची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत ७ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त असू शकते. या वाढीचे श्रेय प्रमुख राज्यांचे आर्थिक योगदान आणि त्यांच्या मूलभूत संरचनेला दिले जाऊ शकते. 

टॅग्स :अर्थव्यवस्थामहाराष्ट्रव्यवसाय