Join us  

जगातील सर्वात श्रीमंत घराणे; मस्क, गेट्स आणि मुकेश अंबानीदेखील यांच्यासमोर वाटतील गरीब

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 3:02 PM

World Richest Royal Family: जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींची एकूण संपत्तीही यांच्यासमोर कमी आहे.

World Richest Royal Family: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? असा प्रश्न विचारल्यावर तुम्ही इलॉन मस्क, जेफ बेजोस, बिल गेट्स किंवा मुकेश अंबानी, यांची नावे घ्याल. पण, जगात असे एक कुटुंब आहे, ज्यांची संपत्ती या सर्वांपेक्षा कैक पटीने जास्त आहे. या शाही कुटुंबासमोर जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीही गरीब वाटतील.    

आम्ही ज्या कुटुंबाबद्दल बोलत आहोत, ते सौदी अरेबियातील क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (MBS) यांचे आहे. प्रिन्स सलमान सध्या सौदी अरेबियाचे पंतप्रधानदेखील आहेत. 2017 मध्ये युवराज म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यापासून मोहम्मद यांनी अनेक सामाजिक आणि आर्थिक सुधारणांचे नेतृत्व केले आहे. 

सौदी अरेबियाच्या या सत्ताधारी राजघराण्याला हाऊस ऑफ सौद म्हणतात. या कुटुंबात 15000 सदस्यांचा समावेश असून, त्यापैकी सुमारे 2000 लोकांकडे बहुतांश संपत्ती आहे. हाऊस ऑफ सौदची एकूण संपत्ती $1.4 ट्रिलियन आहे. ही ब्रिटिश राजघराण्याच्या एकूण संपत्तीच्या 16 पट आहे. विशेष म्हणजे, या कुटुंबातील सदस्य अनेक सेवाभावी संस्थांद्वारे गरजूंना निधी देतात आणि सौदी लोकांमध्ये गुंतवणूक करतात. अगदी अलीकडेच, या कुटुंबाने महिला उद्योजकांसाठी जागतिक बँकेच्या निधीमध्ये लाखोंचे योगदान दिले आहे.

इलॉन मस्क, बिल गेट्स आणि रतन टाटा यांची एकूण संपत्ती एकत्रितपणे हाऊस ऑफ सौदच्या संपत्तीपेक्षा कमी आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती $251.3 अब्ज आहे, तर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची संपत्ती $119.6 अब्ज आणि मुकेश अंबानी यांची संपत्ती सूमारे $100 अब्ज आहे. यांची एकत्रित संपत्ती सौद राजघराण्यापेक्षा कमी आहे. 

टॅग्स :सौदी अरेबियाएलन रीव्ह मस्कबिल गेटसमुकेश अंबानीव्यवसाय