प्रसाद गो. जोशी -अमेरिकेने चीनवरील टॅरिफच्या घोषणेमुळे अमेरिकेतील शेअर बाजारात घसरण झाली असून, आगामी सप्ताहात जाहीर होणारी महागाईची आकडेवारी, आयटी आणि बँकींग कंपन्यांची तिमाही आकडेवारी आणि जागतिक स्तरावरील बाजाराची कामगिरी यावरूनच बाजाराची दिशा ठरणार आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखांच्या भाषणामधून आगामी काळातील व्याजदराबाबतचे संकेतही मिळू शकतात. अमेरिकेच्या शेअर बाजारात घसरण झाल्यामुळे परकीय वित्तसंस्था आता आशियाई देशांमधून आपली गुंतवणूक कमी करण्याची चर्चा आहे.
बँकींग व काही ’आयटी’च्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांची घोषणा होणार असून, त्यामधून बाजारात काही प्रमाणात वाढ अथवा घट होऊ शकते.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिज तेलाचे दर, डॉलर याबाबींवरही बाजाराची वाटचाल अवलंबून राहणार असल्याने त्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
परकीय वित्तसंस्थांकडून भारतामध्ये खरेदीपरकीय वित्तसंस्थांनी भारतीय शेअर बाजारामध्ये गतसप्ताहात खरेदी केली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या १० तारखेपर्यंत परकीय वित्तसंस्थांनी भारतीय शेअर बाजारामध्ये १७०८ कोटी रुपयांची खरेदी केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून खरेदी करीत असलेल्या देशांतर्गत वित्तसंस्थांनी आपली खरेदी कायम ठेवली आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये देशांतर्गत वित्तसंस्थांनी बाजारामध्ये ४५९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामध्ये आगामी सप्ताहात कसा बदल होणार याकडे लक्ष देणेही महत्त्वाचे आहे.
Web Summary : US tariff concerns, inflation data, IT/banking results, and global cues will dictate market direction. Fed hints on interest rates and foreign investment shifts are crucial. Domestic institutional buying remains steady.
Web Summary : अमेरिकी टैरिफ चिंताएं, महंगाई के आंकड़े, आईटी/बैंकिंग परिणाम और वैश्विक संकेत बाजार की दिशा तय करेंगे। फेड द्वारा ब्याज दरों पर संकेत और विदेशी निवेश में बदलाव महत्वपूर्ण हैं। घरेलू संस्थागत खरीदारी स्थिर बनी हुई है।