Join us
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षात साेने हाेणार स्वस्त? आयात शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 11:37 IST

देशात ८०० ते ९०० टन साेने आयात हाेते.

नवी दिल्ली : नव्या वर्षात साेने स्वस्त हाेण्याची शक्यता आहे. वाणिज्य मंत्रालयाने साेन्यावरील आयात शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. केंद्र सरकारने जुलै महिन्यात साेन्यावरील आयात शुल्क १०.७५ टक्क्यांवरुन १५ टक्के केले हाेते. मात्र, रत्न व दागिने क्षेत्रातून त्यात घट करण्याची मागणी हाेत येत आहे. यावर्षी एप्रिल ते नाेव्हेंबर या कालावधीत साेन्याची आयात १८.१३ टक्के घटून २७ अब्ज डाॅलर्स एवढी झाली. देशात ८०० ते ९०० टन साेने आयात हाेते.

टॅग्स :सोनंव्यवसाय