Join us

रिझर्व्ह बँक पुन्हा मोठा निर्णय घेणार, व्याजदरात कपात करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 09:46 IST

कोरोनाच्या संकटाशी सामना करत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावाचा व्यवसाय, उद्योगधंद्यांवर विपरित परिणाम झाल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटाशी सामना करत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून, रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा एकदा व्याजदरात कपात करण्यात येण्याची शक्यता आहे. आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार पुढील वित्तीय समीक्षेमध्ये आरबीआय रेपो दरामध्ये ०.२५ टक्क्यांनी कपात केली जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा मिळू शकतो. 

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या एमपीसी च्या तीन दिवस चालणाऱ्या बैठकीला चार ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, सहा ऑगस्ट रोजी याबाबत काही मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे अर्थव्यवस्थेला होत असलेले नुकसान आणि लॉकडाऊनच्या दुष्परिणामांपासून अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी एमपीसीची बैठक मार्च आणि मे महिन्यात झाली होती. त्यावेळी रेपो दरांमध्ये एकूण १.१५ टक्केंनी कपात करण्याचा निर्णय झाला होता.

 दरम्यान, जीवनावश्यक वस्तूंच्या दरात झालेली वाढ, विशेषकरून मांस, मासे, धान्य आणि डाळी यांच्या किमतीत वाढ झाल्याने जूनमहिन्यात महागाईचा दर वाढून ६.९ टक्के झाला आहे. महागाईचा दिलासादायक स्तर हा चार टक्के असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले होते. मात्र आता महागाई रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या या स्तराच्या पुढे गेली आहे.

दरम्यान, पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार इक्राच्या प्रिंसिपल इकॉनॉमिस्ट अदिती नायर यांनी सांगितले की, आम्ही रेपो दरात ०.२५ आणि रिव्हर्स रेपो दरात ०.३५ टक्के कपातीची अपेक्षा ठेवली आहे. मात्र घाऊक महागाई एमपीसीने ठेवलेल्या मर्यादेच्या बाहेर गेली आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात ती आपल्या कक्षेत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, युनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ यांनी व्याजदरात ०२५ टक्के कपात होण्याची वा व्याजदर जैसे थे राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल 

धक्कादायक! कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी ५० हून अधिक मुलांना पाजली देशी दारू

नवीन नोकरी शोधताय? मग अजिबात करू नका या चुका, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँकिंग क्षेत्रबँकअर्थव्यवस्था