Join us

युद्धाच्या भडक्याने पेट्रोल महागणार? कच्च्या तेलाच्या दरात १० टक्क्यांनी वाढ; शेअर बाजाराने गुंतवणूकदारांच्या हातात दिला भोपळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 15:49 IST

शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे. शेअर बाजाराने गेल्या सहा महिन्यात गुंतवणूकदारांना शून्य टक्के रिटर्न्स दिले आहेत.

इस्रायलनेइराणमधील अणू ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याने जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत एका दिवसात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ३० मे २०२५ रोजी कच्च्या तेलाचे दर ६२ डॉलर प्रतिबॅरल इतक्या खाली घसरले होते. मात्र, यात वाढ होत ते ७८ डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचले आहेत. शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे. शेअर बाजाराने गेल्या सहा महिन्यात गुंतवणूकदारांना शून्य टक्के रिटर्न्स दिले आहेत.

इराण जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे. शिवाय इराणचे भौगोलिक स्थानही अत्यंत महत्त्वाचे आहे. येथे ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ ही एक जलवाहतूक मार्गिका आहे, जिथून सौदी अरेबिया, कुवेत, इराक यासारख्या देशांचा तेल पुरवठा होतो. जर इराणने हा मार्ग बंद केला, तर जगातील सुमारे २० टक्के तेल पुरवठा थांबू शकतो. यामुळे तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.

सामान्य नागरिकांवर काय परिणाम होईल? कच्च्या तेलाच्या किमती अशाच वाढत केल्या तर तेल विक्री कंपन्यांना पेट्रोल,  डिझेलच्या किमती वाढवाव्या लागतील. यामुळे वाहतूक, अन्नपदार्थ,  इतर वस्तू महाग होऊ शकतात. 

तेलाच्या किमती वाढतील? युद्धामुळे जगभरात अस्थिरता वाढल्याने पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा धोका आहे.  कच्च्या तेलाच्या किमती ८० डॉलर प्रतिबॅरलपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :पेट्रोलइराणइस्रायल