Join us

जीएसटीच्या कक्षेत विमान इंधन आणणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 11:49 IST

सध्या एटीएफवर व्हॅट लागतो.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : विमानात वापरण्यात येणारे इंधन म्हणजेच टर्बाईन फ्युअल (एटीएफ) वस्तू व सेवा कराच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा विचार सुरू असून शनिवारी जैसलमेर येथे होत असलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे, असे समजते.

सध्या एटीएफवर व्हॅट लागतो. त्यात केंद्रीय उत्पादन शुल्कही समाविष्ट आहे. त्यामुळे रिफायनरींना करावर कर लागण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. जीएसटीमध्ये आणल्यास या समस्येचे निराकरण होईल. याशिवाय एटीएफ हे रॉकेलचेच एक रूप असल्यामुळे त्याच्या निर्मितीसाठी लागणारे अधिकांश घटक आधीच जीएसटीच्या कक्षेत आहेत. 

अंतिम उत्पादन असलेले एटीएफ मात्र जीएसटीच्या कक्षेबाहेर आहे. त्यामुळे एटीएफ निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर देण्यात आलेल्या जीएसटीसाठी उत्पादक इनपूट टॅक्स क्रेडिट मागू शकत नाहीत.

टॅग्स :विमानजीएसटी