नवी दिल्ली - नवी कर प्रणाली लागू झाल्यानंतर सरकारने वार्षिक १५ लाखाहून अधिक कमाई करणाऱ्या करदात्यांना टॅक्स स्लॅबची मर्यादा वाढवून दिलासा दिला आहे. सरकारने दिलेल्या या सूटमुळे वाढत्या महागाईच्या काळात करदात्यांकडे अधिकचा पैसा शिल्लक राहील. परंतु जर सर्वाधिक कर भरणाऱ्या करदात्यांबाबत बोलायचं झालं तर मागील ५ वर्षात त्यांना कुठलाही दिलासा मिळाला नाही. २०२० ची आकडेवारी पाहिली तर नवीन कर प्रणाली लागू झाल्यापासून आतापर्यंत खर्च महागाई निर्देशांक म्हणजेच CII मध्ये सुमारे २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
१५ लाख उत्पन्न असणाऱ्यांना मिळू शकतो दिलासा
महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी सरकारने ५ वर्षात १५ लाख रुपयाहून कमी उत्पन्न असणाऱ्या करदात्यांसाठी कराची मर्यादा किमान २० ते कमाल ४० टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. परंतु १५ लाख रुपयाहून अधिक कमाई करणाऱ्या करदात्यांसाठी टॅक्स स्लॅबमध्ये कुठलेही बदल करण्यात आले नाहीत. त्या करदात्यांना ३० टक्क्याहून अधिक कर भरावा लागत आहे. आता महागाई आणि इतर खर्च पाहता या श्रेणीतील कर्मचाऱ्यांनाही दिलासा देण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. तसेही आकडेवारीनुसार, आयटीआर भरणाऱ्यांची संख्या पाहिली तर ७० टक्के करदाते हे ५ लाख आणि त्याहून कमी उत्पन्न असणारे आहेत.
जाणून घ्या कोण देते सर्वात जास्त कर?
३० टक्के लोक हे प्रत्यक्ष कर महसूलात सरकार तिजोरीत जास्त योगदान देतात. त्यामुळे अशा लोकांवरील कराचा भार हलका करण्याची मागणी जोर धरत आहे. ज्यामुळे शहरात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल कारण हे लोक जास्त व्याजदरात गृह कर्जावरील हफ्ते भरत असतात. मुलांना शाळेत महागडी फी भरण्यास मजबूर आहेत त्याशिवाय चांगल्या लाईफस्टाईलसाठी खिशा अधिक रिकामा करण्याची वेळ येते. अलीकडेच ग्रँट थॉर्नटन इंडियाच्या सर्व्हेत या श्रेणीतील लोकांनी करात सूट देण्याची मागणी केली आहे.
सर्व्हेनुसार, देशातील ५७ टक्के वैयक्तिक करदाते यंदाच्या बजेटमधून सरकारकडे आस लावून बसले आहेत. २५ टक्क्याहून अधिक टॅक्स स्लॅबमध्ये सूट द्यावी अशी त्यांची मागणी आहे. ७२ टक्के करदात्यांनी नवीन आयकर व्यवस्था निवडीनंतर ६३ टक्के जुन्या व्यवस्थेतून दिलासा मिळावा यासाठी आग्रही आहेत. नव्या टॅक्स सिस्टमकडे आकर्षण वाढवण्यासाठी जवळपास ४६ टक्के कराचा दर घटवण्याची सूचना आहे. ४७ टक्के लोकांना जुन्या कर प्रणालीतून सेट ऑफ मर्यादा म्हणजेच २ लाख रुपये पूर्णपणे हटवले जावेत असं वाटतं.