Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसराईपूर्वी सोन्यात मोठी पडझड! गुंतवणुकीसाठी हीच वेळ योग्य की अजून वाट पाहावी? तज्ज्ञांचे मत काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 16:57 IST

Gold Price : इराण-इस्रायल युद्धामुळे मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. सामान्यतः संकटाच्या काळात सोने महाग होते, परंतु यावेळी परिस्थिती उलटी झाली आहे.

Gold Price : जगभरात जेव्हा जेव्हा युद्धाचे ढग जमा होतात, तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात आणि सोन्याचे दर वाढतात, हा आजवरचा इतिहास आहे. मात्र, सध्या इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. इराणने कच्च्या तेलाचे दर २०० डॉलरपर्यंत नेण्याची धमकी दिल्यानंतरही सोन्याच्या दरात घसरण होत आहे. हे गणित नेमके काय आहे आणि हीच वेळ सोने खरेदीसाठी योग्य आहे का, याचा घेतलेला हा आढावा.

युद्धात सोनं महाग होण्याऐवजी स्वस्त का?नेहमीच्या विरुद्ध घडणाऱ्या या प्रक्रियेमागे अमेरिकन डॉलर आणि व्याजाचे गणित दडलेले आहे.तेलाचा भडका आणि महागाई : इराणच्या युद्धामुळे कच्च्या तेलाने १०० डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. तेल महागल्याने अमेरिकेत महागाई वाढण्याची भीती आहे.फेडरल रिझर्व्हची भूमिका : महागाई वाढली की अमेरिकन मध्यवर्ती बँक व्याजदर कमी करत नाही. 'गोल्डमन सॅक्स'च्या मते, आता सप्टेंबरपूर्वी व्याजदर कपात होण्याची शक्यता नाही.मजबूत डॉलर : व्याजदर चढे राहिल्याने डॉलर अधिक मजबूत होतो. जेव्हा डॉलर मजबूत होतो, तेव्हा जागतिक बाजारपेठेत सोन्यावर दबाव येतो आणि दर कमी होतात.

भारतीय बाजारपेठेतील आजचे दरसोने (२४ कॅरेट) : दिल्लीत आज १६,३४७ रुपये प्रति ग्रॅम.गोल्ड फ्युचर्स : २८३ रुपयांच्या घसरणीसह १,६१,५०६ रुपये प्रति १० ग्रॅम.चांदी: १,९९१ रुपयांच्या घसरणीसह २,६६,५०० रुपये प्रति किलो.

खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे का?तज्ज्ञांच्या मते, सध्याची घसरण ही खरेदीची चांगली संधी असू शकते, कारणभारतात लग्नसराई जवळ असल्याने देशांतर्गत मागणी वाढणार आहे.जर 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' बंद झाली, तर तेल आणि महागाई दोन्ही हाताबाहेर जातील, ज्यामुळे सोन्याची मागणी पुन्हा उसळी घेईल.आंतरराष्ट्रीय बाजारात सोने स्वस्त झाले तरी रुपया कमकुवत होत असल्याने भारतात सोन्याचे दर फार खाली येण्याची शक्यता कमी आहे.

वाचा - IT क्षेत्रात 'एआय'चे सावट; टेक महिंद्राकडून १००० इंजिनिअर्सची भरती लांबणीवर! फ्रेशर्सचे भवितव्य टांगणीला

तज्ज्ञांचा सल्ला : काय करावे?तज्ज्ञांच्या मते, सध्या सोन्यात गुंतवणूक करताना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.एकदम मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी थोड्या-थोड्या प्रमाणात खरेदी करा.जर तुम्ही ५-१० वर्षांसाठी गुंतवणूक करत असाल, तर ही घसरण एक उत्तम संधी आहे.अल्पकालीन नफ्यासाठी शुक्रवारचा 'PCE डेटा' आणि पुढील आठवड्यातील 'फेड'चे संकेत पाहूनच निर्णय घ्यावा.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold prices plummet before wedding season: Buy now or wait?

Web Summary : Gold prices are falling despite global tensions. Experts suggest phased investment due to upcoming wedding season demand and potential geopolitical risks. Dollar strength impacts gold rates.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूकअमेरिका-इस्रायल-इराण वॉर