Cibil Score: कर्ज किंवा क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लोकांसाठी सिबिल स्कोअर खूप महत्त्वाचा असतो. हे तुमचे आर्थिक फायनान्शिअल परफॉर्मन्स रिपोर्ट कार्डसारखं असतं, जे तुम्ही क्रेडिट किती जबाबदारीनं हाताळता हे दर्शवतं. बहुतेक लोक मानतात की जर ईएमआय (EMI) वेळेवर भरला तर आपला स्कोअर नेहमी चांगला राहील. पण अनेकवेळा ईएमआय भरूनही सिबिल स्कोअर खाली येऊ लागतो. चूक कुठे होत आहे, हे पाहून गोंधळ होतो.
जर तुमच्यासोबत असं घडत असेल, तर एकदा तुमचा क्रेडिट मिक्स (Credit Mix) आणि इतर घटकांना नक्की तपासा, कारण तुमचा स्कोअर निश्चित करण्यापूर्वी बँक तुमच्या परतफेडीच्या इतिहासाव्यतिरिक्त अनेक अन्य घटकांचा विचार करतात. क्रेडिट मिक्स आणि इतर घटकांबद्दल येथे जाणून घ्या.
Paytm च्या फाऊंडरचं बिल झालं व्हायरल; ₹४०,००० च्या जेवणावर वाचवले ₹१६,०००, कशी झाली ही कमाल
क्रेडिट मिक्स म्हणजे काय?
क्रेडिट मिक्स म्हणजे तुम्ही किती सुरक्षित कर्ज (Secured Loan) आणि किती असुरक्षित कर्ज (Unsecured Loan) घेतली आहेत.
सुरक्षित कर्ज (Secured Loan) जसं: होम लोन, कार लोन.
असुरक्षित कर्ज (Unsecured Loan) जसं: पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड.
जर तुमच्याकडे फक्त पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्डसारखं असुरक्षित कर्जच जास्त असतील आणि सुरक्षित कर्ज खूप कमी किंवा बिलकुल नसतील, तर बँक आणि एनबीएफसीला (NBFC) संकेत मिळतो की तुमचं उधारीवर जास्त अवलंबित्व आहे. यामुळे तुमचा सिबिल स्कोअर घसरू शकतो.
दुसरीकडे, जर तुम्ही दोन्ही प्रकारचे कर्ज घेतलं असेल आणि वेळेवर परतफेड करत असाल, तर हे दर्शवते की तुम्ही क्रेडिट चांगले व्यवस्थापित करू शकता. अशा लोकांचं क्रेडिट मिक्स बॅलन्स्ड मानलं जातं आणि त्यांचा सिबिल स्कोअर उत्तम असतो. म्हणूनच तज्ज्ञ नेहमी सांगतात की, गरज नसताना पर्सनल लोन किंवा खूप जास्त क्रेडिट कार्ड वापरणं टाळावं.
सिबिल स्कोअर खाली आणणारे इतर घटक
१. क्रेडिट यूटिलायझेशन रेश्यो (Credit Utilization Ratio)
तुमच्या क्रेडिट कार्डची जी मर्यादा आहे, त्यापैकी तुम्ही किती वापर करत आहात, याला क्रेडिट यूटिलायझेशन रेश्यो म्हणतात. जर तुम्ही तुमच्या मर्यादेपैकी ६०-९०% पर्यंत दर महिन्याला वापरत असाल, तर हे दर्शवते की तुम्ही सतत क्रेडिटवर अवलंबून आहात. क्रेडिट कार्ड मर्यादेपैकी फक्त ३०% पर्यंतच वापरण्याचा प्रयत्न करा.
२. क्रेडिट हिस्ट्रीचं एज
जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कर्ज घेता किंवा क्रेडिट कार्ड घेता, तेव्हापासून तुमची क्रेडिट हिस्ट्री बनण्यास सुरुवात होते. सिबिल स्कोअर तयार करताना तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीचाही विचार केला जातो. तुमची क्रेडिट हिस्ट्री किती जुनी आहे आणि तुम्ही यापूर्वीही कर्ज घेतल्यानंतर किंवा क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर वेळेवर पेमेंट केलं आहे की नाही, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. या क्रेडिट हिस्ट्रीचा परिणामही तुमच्या सिबिल स्कोअरवर होतो.
३. लोन सेटलमेंट किंवा गॅरेंटर बनणे
जर तुम्ही यापूर्वी कधी लोन सेटलमेंट केलं असेल किंवा तुम्ही कोणाच्या कर्जासाठी गॅरेंटर बनला असाल आणि ती व्यक्ती पेमेंटमध्ये डिफॉल्ट करत असेल, तर त्याचं नुकसान तुमच्या स्कोअरलाही होतं.
४. क्रेडिट रिपोर्टमधील चुका
अनेकदा बँक किंवा कर्ज देणाऱ्या संस्थेकडून चुकीची रिपोर्टिंग केली जाते—उदाहरणार्थ, तुम्ही पेमेंट केले असेल पण सिस्टममध्ये अपडेट झालं नसेल. यामुळेही स्कोअर घसरू शकतो. म्हणूनच, वेळोवेळी क्रेडिट रिपोर्ट तपासणं आवश्यक आहे.
Web Summary : CIBIL score dips despite timely EMI payments? Credit mix, utilization ratio, credit history age, and reporting errors impact your score. Balance secured/unsecured loans, use <30% credit limit, and check reports regularly to maintain a healthy score.
Web Summary : समय पर ईएमआई भरने के बावजूद सिबिल स्कोर गिरता है? क्रेडिट मिक्स, उपयोग अनुपात, क्रेडिट इतिहास और रिपोर्टिंग गलतियाँ स्कोर को प्रभावित करती हैं। सुरक्षित/असुरक्षित ऋणों को संतुलित करें, 30% से कम क्रेडिट सीमा का उपयोग करें, और स्कोर बनाए रखने के लिए रिपोर्ट की जाँच करें।