Join us

रतन टाटांना अमेरिकेतच व्हायचं होतं स्थाईक; पण एके दिवशी तडकाफडकी मायदेशी परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 21:02 IST

उद्योगपती रतन टाटांना भारतात परतायचंच नव्हतं; पण एका व्यक्तीमुळे ते मायदेशी आले

उद्योगपती रतन टाटा यांचं नाव माहीत नसलेली व्यक्ती सापडणं अवघडच. टाटा समूहाचं नेतृत्त्व करताना टाटांच्या आयुष्यात अनेक अवघड प्रसंग आले. आव्हानांचा डोंगर समोर उभा राहिला. पण टाटांनी परिस्थितीशी कडवी झुंज देत टाटा समूहाचा विस्तार झाला. आज हा समूह मिठापासून गाड्यांपर्यंत अनेक उत्पादनांची निर्मिती करतो. काळाची पावलं ओळखून टाटांनी टीसीएस सुरू केली. टाटा समूहाला टीसीएसमधून मिळणारं उत्पन्न खूप मोठं आहे. 

गेल्या अनेक दशकांपासून भारतात राहणाऱ्या, भारतीय संस्कृतीशी अगदी समरसून गेलेल्या रतन टाटांना भारतात यायचंच नव्हतं, असं कोणी सांगितलं तर अनेकांना ते खोटं वाटेल. पण एक काळ असा होता की रतन टाटा लॉज एँजेलिसमध्ये वास्तव्यास होते. त्यांना तिथलं स्वातंत्र, खुलं वातावरण आवडायचं. त्यामुळे तिथेच स्थिरस्थावर होण्याची त्यांची इच्छा होती. पीटर केसी यांनी 'द स्टोरी ऑफ टाटा' या पुस्तकात ही गोष्ट नमूद केली आहे.

रतन टाटांना लॉज एँजेलिसमध्येच स्थानिक व्हायचं होतं. त्यांना तिथलं मोकळंढाकळं वातावरण आवडलं होतं. तिथे रतन टाटा एका अपार्टमेंटमध्ये राहायचे. पण रतन टाटांच्या आजीची प्रकृती बिघडली. आजीची प्रकृती गंभीर असल्यानं टाटांना भारतात परतावं लागलं, असं पीटर केसींनी पुस्तकात लिहिलं आहे.

रतन टाटा अमेरिकेत वास्तुविशारद म्हणून काम करत होते. तिथे त्यांची एक प्रेयसीदेखील होती. रतन टाटा भारतात परतले. त्यामुळे त्यांना तिच्यासोबत नातं पुढे कायम ठेवता आलं नाही. रतन टाटांचा एकदा साखरपुडादेखील झाला. मात्र ते नातं मोडलं. त्यानंतर टाटांनी कधीच लग्न केलं नाही, असं केसींनी पुस्तकात लिहिलं आहे.

टॅग्स :रतन टाटाटाटा