Join us  

तुमचा ‘डेटा’ का, कुठे वापरला? फेसबुक, इंन्स्टाग्राम देणार माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 6:54 AM

‘मेटा’ने बदलली पॉलिसी; युजर्सना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : समाजमाध्यमातील दिग्गज कंपनी मेटाने पुन्हा एकदा आपल्या गोपनीयता पॉलिसीत सुधारणा केली आहे. फेसबुक, मेसेंजर आणि इन्स्टाग्रामसाठी त्यांची डेटा धोरणे अद्ययावत करत असल्याचे गुरुवारी मेटाने सांगितले आहे. यानुसार फेसबुक, मेसेंजर, इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना त्यांची वैयक्तिक माहिती कंपनी कधी, केव्हा आणि कोणत्या कारणासाठी वापरत आहे, हे कळणार आहे.

कंपनीने सांगितले की, या नवीन पॉलिसीचे नाव गोपनीयता पॉलिसी आहे, जी २६ जुलैपासून लागू होणार आहे. या पॉलिसीमुळे वापरकर्त्यांना लोकेशन संबंधित तपशीलासह इंटरनल प्रोटोकॉल ॲड्रेसचीही माहिती मिळणार आहे. पॉलिसीव्यतिरिक्त फेसबुक, मेसेंजर व इन्स्टाग्रामच्या सेवेला कालावधीही वापरकर्त्यांच्या गरजेनुसार अपडेट करण्यात आला असल्याचे मेटाने म्हटले आहे. नुकतेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि भारतासह अनेक युरोपीय देशांनी मेटाच्या प्रायव्हसी पॉलिसीला विरोध  करत कडक सूचनाही दिल्या होत्या. त्यानंतर मेटाने यात सुधारणा केल्या आहेत.

वापरकर्त्यांना धोरण अनिवार्य नाहीn भारत सरकारनेही मेटाला कडक निर्देश दिले होते. कंपनीने असे गोपनीयता धोरण अजिबात बनवू नये, ज्यामुळे नागरिकांच्या गोपनीयतेवर कोणताही परिणाम होईल असे सरकारने म्हटले होते. n या कारणामुळे भारतीय वापरकर्त्यांना मेटाचे नवीन धोरण स्वीकारणे बंधनकारक राहणार नाही.

टॅग्स :फेसबुकइन्स्टाग्राम