Join us
Daily Top 2Weekly Top 5

Who is Sudha Dwivedi: रेल्वेच्या TTI सुधा द्विवेदी यांनी असं काय केलं, जे किरण मुझुमदार शॉ यांनी केलं कौतुक; सांगितली गरज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 08:27 IST

Who is Sudha Dwivedi: मुंबई विभागातील तिकीट निरीक्षक सुधा द्विवेदी यांनी तिकीट तपासणीच्या क्षेत्रात एक नवा मैलाचा दगड प्रस्थापित केला आहे. किरण मुझुमदार शॉ यांनी यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली.

Who is Sudha Dwivedi: मुंबई विभागातील तिकीट निरीक्षक सुधा द्विवेदी यांनी तिकीट तपासणीच्या क्षेत्रात एक नवा मैलाचा दगड प्रस्थापित केला आहे. त्यांनी एकाच दिवसात ५५,२१० रुपये इतका दंड वसूल करून एक नवा विक्रम नोंदवला असून, हा कोणत्याही तिकीट निरीक्षकानं एका दिवसात जमा केलेला आतापर्यंतचा सर्वाधिक दंड ठरलाय. इंडियन टेक इन्फ्रा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनं सुधा द्विवेदी यांच्या या उल्लेखनीय यशाची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर शेअर केली आहे.

किरण मझुमदार-शॉ यांच्याकडून विशेष कौतुक

बायोकॉनच्या अध्यक्षा किरण मजूमदार-शॉ सुधा द्विवेदी यांच्या या कामगिरीनं अत्यंत प्रभावित झाल्या असून त्यांनी सोशल मीडियावरून त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. भारताला प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक विभागात सुधा द्विवेदी यांच्यासारख्या कर्तबगार महिलांची गरज असल्याचं मत त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केलं.

किरण मझुमदार-शॉ यांचा व्यावसायिक प्रवास

किरण मझुमदार-शॉ या भारतातील सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिलांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी १९७८ मध्ये बायोकॉन या बायोफार्मास्युटिकल कंपनीची स्थापना केली असून सध्या त्या या कंपनीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार त्यांची रिअल-टाइम नेटवर्थ ३.५ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ३२,१३४ कोटी रुपये इतकी आहे. 

त्यांच्या नेतृत्वाखाली बायोकॉनने अनेक मोठे जागतिक व्यवहार यशस्वी केले आहेत, ज्यात २०२२ मध्ये अमेरिकन औषध कंपनी वियाट्रिसचा बायोसिमिलर व्यवसाय ३.३ अब्ज डॉलरला खरेदी करणं आणि सप्टेंबर २०२४ मध्ये बिकारा थेरप्यूटिक्स या कॅन्सर थेरपी कंपनीचा नॅस्डॅकवर ३६२ दशलक्ष डॉलरचा यशस्वी IPO आणणं यांचा समावेश होतो. 

डिसेंबर २०२५ मध्ये, बायोकॉननं जाहीर केलं की ते त्यांच्या बायोसिमिलर आणि जेनेरिक औषध व्यवसायाला बळकटी देण्यासाठी खाजगी उपकंपनी बायोकॉन बायोलॉजिक्समधील उर्वरित हिस्सा विकत घेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Railways' TTI Sudha Dwivedi's achievement lauded by Kiran Mazumdar-Shaw.

Web Summary : Sudha Dwivedi, a railway ticket inspector, set a record by collecting ₹55,210 in fines in one day. Kiran Mazumdar-Shaw praised her achievement, emphasizing the need for dedicated women like her in all sectors for India's progress.
टॅग्स :रेल्वेकिरण मुजुमदार- शॉ