Who is Kay Mehta: जेव्हा तुमच्या मनात जिद्द असते आणि तुमची इच्छाशक्ती दृढ असते तेव्हा कोणतंही आव्हान तुम्हाला मोठं वाटत नाही. असंच काहीसं उदाहणर अदानी समूहातील एका कर्मचाऱ्यानं दाखवून दिलंय, ज्याचं नाव Kay Mehta असं आहे. व्हीलचेअरवर असताना बंजी जंप मारून त्यानं सर्वांनाच चकीत केलं. त्याच्या या साहसाची सर्वत्र चर्चा होत आहे. खुद्द गौतम अदानी यांनीही त्याचं कौतुक केलं असून तो लोकांसाठी प्रेरणा असल्याचं म्हटलं आहे.
अदानी समूहातील कर्मचारी
अदानी समूहात काम करणारे के मेहता हे बऱ्याच काळापासून व्हीलचेअरवर आहेत. अॅडव्हेन्चरची आवड असलेल्या के. मेहता यांनी आपलं लिमिट पूश करून बंजी जंपिंग करण्याचा निर्णय घेतला. सहसा हा खेळ खूप जोखमीचा असतो, पण व्हीलचेअरवर असताना त्यांनं तो अगदी सोप्या पद्धतीनं पार पाडला, हे एका चमत्कारापेक्षा कमी नाही.
'या' कंपनीत ४९% हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत LIC, नव्या क्षेत्रात एन्ट्री; काय आहे प्लान?
गौतम अदानींकडून कौतुक
ऋषिकेशच्या प्रसिद्ध बंजी जंपिंग पॉईंटवरून त्यानं हा रोमांचक स्टंट केला, जिथे त्यानं अनेक फूट उंचीवरून उडी मारली. कडक सुरक्षा व्यवस्थेत उडी मारताच तेथे उपस्थित प्रेक्षकही टाळ्यांच्या कडकडाटात आश्चर्यचकित आणि उत्साही झाले. गौतम अदानीयांनी ही पोस्ट शेअर केली. बहुतेक लोक हे साहसासाठी करतात. आमच्याच अदानी समूहाचे कर्मचारी मेहता यांनी ऋषिकेशच्या उंचीवरून एक अशी झेप घेतली ज्यानं जगाला सांगितलं की, कोणताही अडथळा, कोणतीही भीती आपल्या इच्छाशक्तीला रोखू शकत नाही. आपण केवळ आम्हाला प्रेरणा देत नाही, तर अदानीयन असण्याचा अर्थ काय आहे हे आपण पुन्हा परिभाषित करता. आम्ही करून दाखवतो.
गौतम अदानी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यापासून हजारो लोकांनी तो पाहिला आणि लाइक केला आहे. त्यानंतर युजर्सनं के मेहता यांचं कौतुक केलंय.