Anthropic CTO Rahul Patil: फेब्रुवारी २०२६ च्या सुरुवातीला टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल टेक यांसारख्या भारतातील आघाडीच्या आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. अवघ्या तीन-चार दिवसांत निफ्टी आयटी इंडेक्स सुमारे ८ टक्क्यांनी घसरला, ज्यामुळे भारतीय टेक कंपन्यांच्या बाजारमूल्यात अंदाजे २.५ लाख कोटी रुपयांची घट झाली. या घसरणीचं मुख्य कारण अमेरिकन एआई कंपनी 'एन्थ्रोपिक'नं सादर केलेलं 'क्लाउड कोवर्क' हे नवीन अपडेट.
या टूलनं 'इंडस्ट्री स्पेसिफिक ऑटोमेशन' आणलंय, ज्याचा अर्थ असा की एआई आता मानवी मदतीशिवाय कायदेशीर करारांची तपासणी, कोड मॅनेजमेंट, डॉक्युमेंट हँडलिंग, सेल्स, मार्केटिंग आणि डेटा ॲनालिसिस यांसारखे संपूर्ण वर्कफ्लो स्वतः हाताळू शकतं. यामुळे 'सॉफ्टवेअर-एज-ए-सर्व्हिस' (SaaS) आणि आयटी सेवांच्या व्यवसायाला धोका निर्माण होईल, अशी भीती गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली आहे. या परिस्थितीला लोक 'सास्पोकॅलिप्स' (SaaS-pocalypse) असं म्हणत आहेत. या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी भारतीय वंशाचे टेक लीडर राहुल पाटील यांचं नाव चर्चेत आहे.
अमेरिका-रशियामध्ये होणारे का सिक्रेट डील? म्हणूनच रात्रीत झाला इतका मोठा ‘खेळ’
कोण आहेत राहुल पाटील?
राहुल पाटील हे सध्या एन्थ्रोपिकचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणजेच सीटीओ (CTO) आहेत. ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. मूळचे बंगळुरूचे रहिवासी असलेल्या राहुल पाटील यांनी पीईएस युनिव्हर्सिटीमधून अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमधून एमएस आणि वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमधून एमबीएची पदवी संपादन केली.
राहुल पाटील यांचा प्रवास
राहुल पाटील यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात मायक्रोसॉफ्टमधून केली, जिथे त्यांनी सुमारे नऊ वर्षे काम केलं. त्यानंतर त्यांनी ॲमेझॉनच्या किनेसिस (AWS) मध्ये आणि नंतर ओरेकल क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एसव्हीपी म्हणून ३० पेक्षा जास्त उत्पादनांची जबाबदारी सांभाळली. पाच वर्षे त्यांनी स्ट्राइपमध्ये इंजिनिअरिंग आणि ग्लोबल ऑपरेशन्सचे नेतृत्व केलं, जिथे त्यांनी सीटीओ म्हणूनही काम पाहिलं. एन्थ्रोपिकमध्ये आल्यानंतर त्यांनी क्लाउड एआईला मोठ्या स्तरावर एंटरप्राइजेससाठी सज्ज केलं. त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर, वेग आणि खर्चाच्या नियोजनावर विशेष लक्ष केंद्रित केलं. महागड्या जीपीयूंवर क्लाउड अधिक चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी त्यांनी मेमरी वापर आणि डिकोडिंग प्रक्रिया वेगवान केली, ज्यामुळे ऑपरेटिंग खर्च कमी झाला.
वॉल स्ट्रीटवरील 'पाटील इफेक्ट'
राहुल पाटील यांच्या या योगदानामुळे वॉल स्ट्रीटवर याला 'पाटील इफेक्ट' म्हटलं जात आहे. राहुल पाटील यांनी लिंक्डइनवर व्यक्त होताना सांगितले की, जगाला एआयबद्दल उत्सुकता वाटेल अशा एका नम्र आणि प्रतिभावान टीमसोबत काम करताना त्यांना आनंद होत आहे. एन्थ्रोपिकचे मूल्य आता १८३ अब्ज डॉलर्सवर पोहोचलं असून कंपनीला नुकताच १३ अब्ज डॉलर्सचा निधी मिळाला आहे. कंपनीचा महसूल ५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे. भारतीय टॅलेंटचा फायदा घेण्यासाठी कंपनी आता टोक्योनंतर बंगळुरूमध्ये आपलं दुसरे जागतिक केंद्र उघडत आहे.
राहुल पाटील यांच्यासारख्या नेतृत्वामुळे हे स्पष्ट झाले आहे की, एआय आता केवळ चॅटबॉट राहिलेलं नसून ते संपूर्ण बिझनेस प्रोसेस बदलण्यास सक्षम आहे. अशा स्थितीत भारतीय आयटी क्षेत्राला आता आउटसोर्सिंगच्या जुन्या मॉडेलपेक्षा एआई कौशल्यांवर अधिक लक्ष केंद्रित करावं लागणार आहे.
Web Summary : Anthropic CTO Rahul Patil's 'Cloud Kework' tool sparked SaaS concerns, impacting Indian IT. Patil, an Indian native, leads Anthropic's AI advancements, driving business process changes and expansion into Bangalore. His work is being called the Patil Effect.
Web Summary : एंथ्रोपिक के सीटीओ राहुल पाटिल के 'क्लाउड केवर्क' टूल ने एसएएएस चिंताओं को बढ़ाया, जिससे भारतीय आईटी प्रभावित हुआ। भारतीय मूल के पाटिल, एंथ्रोपिक की एआई प्रगति का नेतृत्व कर रहे हैं, जो व्यापार प्रक्रिया परिवर्तन और बैंगलोर में विस्तार को बढ़ावा दे रहे हैं। उनके काम को पाटिल इफेक्ट कहा जा रहा है।