Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहेत पवन नंदा आणि सौम्या सिंह राठौर? WinZO च्या संस्थापकांना अटक, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:46 IST

ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म विन्झोन (WinZO) सह-संस्थापक पवन नंदा आणि सौम्या सिंह राठौर यांना सक्तवसुली संचालनालयानं अटक केली. काय आहे प्रकरण जाणून घ्या.

ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म विन्झोन (WinZO) सह-संस्थापक पवन नंदा आणि सौम्या सिंह राठौर यांना सक्तवसुली संचालनालयानं (ED) मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली बुधवारी अटक केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच रात्री त्यांना बंगळुरु येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं, जिथे त्यांना एका दिवसाची कोठडी सुनावण्यात आली.

ईडीचे आरोप

रिअल-मनी गेमिंगवर सरकारी बंदी लागू झाल्यानंतर खेळाडूंना परत करण्याची असलेली ४३ कोटी रुपयांची रक्कम कंपनीने रोखून ठेवली असल्याचं ईडीनं म्हटलंय. गेल्या आठवड्यात ईडीने विन्झो आणि गेमझक्राफ्ट (Gamezkraft) सह अनेक गेमिंग कंपन्या आणि त्यांच्या प्रवर्तकांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. ईडीचा आरोप आहे की विन्झोनं खेळाडूंना माहिती न देता अल्गोरिदमविरुद्ध स्पर्धा करायला लावली, म्हणजेच खेळाडूंना वाटलं की ते खऱ्या प्लेअर्सविरोधात खेळत आहेत, तर प्रत्यक्षात ते सॉफ्टवेअरविरुद्ध खेळत होते. ईडीचा असाही आरोप आहे की, विन्झोनं भारतातील बंदी असतानाही ब्राझील, अमेरिका आणि जर्मनी यांसारख्या देशांमध्ये भारतातूनच रिअल-मनी गेम्स चालवले. ईडीनं विन्झोचे ५०५ कोटी रुपयांचे बॉन्ड्स, एफडी आणि म्युच्युअल फंड्स देखील गोठवले आहेत.

सोन्याच्या दरात घसरण, चांदी मात्र सुस्साट... एकाच झटक्यात २७५८ रुपयांची तेजी, पाहा नवी किंमत

कोण आहेत पवन नंदा आणि सौम्या सिंह राठौर

पवन नंदा: ३८ वर्षीय पवन नंदा हे भारतीय उद्योजक आणि WinZO चे सह-संस्थापक आहेत. यापूर्वी त्यांनी जोस्टेल (ZoStel) आणि झेडओ रूम्स (ZO Rooms) सारखे प्रकल्प उभे केलेत. त्यांनी एनएसआयटी दिल्लीमधून इंजिनीअरिंग आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) कोलकातामधून एमबीए (MBA) केलं आहे. पवन नंदा आणि सौम्या सिंह राठौर यांची एकत्रित संपत्ती सुमारे ९६२ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं.

सौम्या सिंह राठौर: सौम्या सिंह राठौर या WinZO च्या सह-संस्थापक आहेत. हे सोशल आणि रिअल-मनी गेमिंग ॲप २०१८ मध्ये लॉन्च करण्यात आले होते. यापूर्वी त्यांनी त्यांचे सह-संस्थापक पवन नंदा यांच्यासोबत ZO Rooms मध्येही काम केलं आहे. त्यांनी टाइम्स इंटरनेटमध्ये इंग्लिश एंटरटेनमेंट क्लस्टरच्या भागीदार, टाइम्स ऑफ इंडियामध्ये कंपेन्सेशन अँड बेनिफिट्सच्या प्रमुख आणि टाइम्स ग्रुपच्या कंपन्यांमध्ये बिझनेस मॅनेजर म्हणून काम केलंय.

त्यांना केपीएमजी लंडनमध्ये काम करण्याचा अनुभव

त्यांनी २००५ मध्ये बंगळुरु विद्यापीठातून प्लाइड क्लिनिकल सायकॉलॉजीचे (Applied Clinical Psychology) शिक्षण घेतलं आणि नंतर युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टरमधून मास्टर इन ऑर्गनायझेशन, इंडस्ट्रियल अँड कंझ्युमर सायकॉलॉजीची पदवी घेतली. हुरुन वेल्दी वुमन लिस्ट २०२१ नुसार, सौम्या यांची संपत्ती ५२० कोटी रुपये आहे.

WinZO चं म्हणणं काय?

विन्झोनं आपल्या निवेदनात ईडीचे सर्व आरोप फेटाळले आहेत. कंपनीच्या प्रवक्त्यानं म्हटलं की, "प्लॅटफॉर्मवर निष्पक्षता आणि पारदर्शकता ही आमची प्राथमिकता आहे. आम्ही सर्व नियमांचं पालन करत आहोत आणि युजर्सच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत."

English
हिंदी सारांश
Web Title : WinZO Founders Arrested: Who are Pawan Nanda and Saumya Singh?

Web Summary : WinZO co-founders Pawan Nanda and Saumya Singh Rathore were arrested by the ED for money laundering. The ED alleges the company withheld ₹43 crore owed to players after a real-money gaming ban. WinZO denies the charges, claiming compliance and user safety.
टॅग्स :व्यवसायअंमलबजावणी संचालनालय