Join us
Daily Top 2Weekly Top 5

SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 08:40 IST

Mutual Fund SIP Dare: म्युच्युअल फंडमधील एसआयपी (SIP) गुंतवणूक लोकप्रिय होत असताना, अनेक गुंतवणूकदारांच्या मनात एक प्रश्न कायम असतो की, गुंतवणुकीसाठी महिन्यातील कोणती तारीख सर्वोत्तम आहे?

Mutual Fund SIP Dare: म्युच्युअल फंडमधीलएसआयपी (SIP) गुंतवणूक लोकप्रिय होत असताना, अनेक गुंतवणूकदारांच्या मनात एक प्रश्न कायम असतो की, गुंतवणुकीसाठी महिन्यातील कोणती तारीख सर्वोत्तम आहे? या प्रश्नाचं उत्तर आज जाणून घेण्याचा प्रयत्न करू. एका लार्ज कॅप म्युच्युअल फंडच्या १० वर्षांच्या (मार्च २०१५ ते मार्च २०२५) आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला.

या अभ्यासानुसार, महिन्याच्या कोणत्याही तारखेला गुंतवणूक केली तरी सरासरी परतावा हा १३.०७% ते १३.२६% च्या दरम्यान राहिला. उदाहरणार्थ, जर तुम्ही २००० रुपयांची मासिक एसआयपी १० वर्षांसाठी केली, तर वेगवेगळ्या तारखांमुळे मिळणाऱ्या एकूण रकमेत केवळ ६,००० रुपयांचा फरक पडला. यावरून हे सिद्ध होतं की, दीर्घकालीन गुंतवणुकीत तारखेचा परताव्यावर फारसा परिणाम होत नाही.तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी तारखेपेक्षा खालील गोष्टींवर अधिक लक्ष देणं आवश्यक आहे.

तुम्ही कोणत्या फंड हाऊसमध्ये आणि कोणत्या प्रकारच्या योजनेत (स्मॉल, मिड किंवा लार्ज कॅप) गुंतवणूक करत आहात.तुम्ही किती वर्षांसाठी (१०, २० किंवा ३० वर्षे) बाजारात टिकून राहता.दरवर्षी आपल्या गुंतवणुकीच्या रकमेत थोडी-थोडी वाढ करणं.बाजारात घसरण झालेली असो किंवा वाढ झालेली असो, आपल्या एसआयपीचे हप्ते न थांबवणं.

अल्पकालीन विरुद्ध दीर्घकालीन गुंतवणूक

जर तुम्ही केवळ ६ महिने किंवा १ वर्षासाठी गुंतवणूक करत असाल, तर बाजारातील चढ-उतारानुसार तारखेचा थोडा परिणाम दिसू शकतो. मात्र, १०-१५ वर्षांच्या दीर्घ प्रवासात 'रुपी कॉस्ट एव्हरेजिंग'मुळे (Rupee Cost Averaging) खरेदीचा दर सरासरी होतो. तुम्ही कधी चढ्या भावानं तर कधी स्वस्त भावानं युनिट्स खरेदी करता, ज्यामुळे दीर्घकाळात गुंतवणुकीचं मूल्य संतुलित होतं.

गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम तारीख कोणती?

एसआयपीची तारीख ठरवण्याचा सर्वोत्तम निकष बाजाराची हालचाल नसून तुमचा 'कॅश फ्लो' म्हणजेच पैसे येण्याची वेळ असायला हवी. जर तुमचा पगार महिन्याच्या १ ते ५ तारखेच्या दरम्यान येत असेल, तर याच काळात एसआयपी सेट करणं सर्वात सुरक्षित आहे. यामुळे खात्यात पुरेशी रक्कम राहते आणि हप्ता चुकून दंड लागण्याची भीती राहत नाही. 

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : SIP Date Doesn't Matter Much; Focus on Investment Strategy!

Web Summary : SIP date has minimal impact long-term. Focus on fund house, investment duration, increasing contributions, and consistent investments despite market fluctuations. Prioritize aligning SIP date with your cash flow for hassle-free deductions.
टॅग्स :म्युच्युअल फंडएसआयपीगुंतवणूकपैसा