Join us  

5-जी इंटरनेटचा स्पीड सर्वाधिक कुठे मिळतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 7:03 AM

5G Internet : भारतात ऑक्टोबर २०२२ मध्ये ५-जी नेटवर्क सुरू झाले. सुरुवातीच्या काळात भारतात इंटरनेटचा स्पीड तितका चांगला नसल्याने इतर देशांच्या तुलनेत रँकिंगमध्ये भारत खूप मागे होता. परंतु आता स्थिती खूप बदललेली आहे.

नवी दिल्ली - भारतात ऑक्टोबर २०२२ मध्ये ५-जी नेटवर्क सुरू झाले. सुरुवातीच्या काळात भारतातइंटरनेटचा स्पीड तितका चांगला नसल्याने इतर देशांच्या तुलनेत रँकिंगमध्ये भारत खूप मागे होता. परंतु आता स्थिती खूप बदललेली आहे. आज भारताचा समावेश सर्वात वेगवान  ५-जी नेटवर्क देणाऱ्या टॉप १५ देशांमध्ये झाला आहे. भारतात २०२३ च्या चौथ्या तिमाहीत सरासरी ३०१ एमबीपीएसचा स्पीड दिला जातोय. 

उपलब्धता ५० टक्क्यांनी वाढली - भारतात ५-जी नेटवर्कची उपबल्धता आधीपेक्षा ५० टक्के अधिक आहे. या नेटवर्कची उपलब्धता वाढल्याने आता बहुतांश कंपन्या ५-जी नेटवर्कचे स्मार्टफोन बाजारात लाँच करताना दिसत आहेत. - ५-जी नेटवर्क स्मार्टफोनच्या किमती कमी होत असल्या तरी अनेकजण फोन अपग्रेड करण्याचा पर्याय निवडताना दिसत आहेत. 

व्हिडीओ स्ट्रिमिंगला जोरदार डिमांड : हायस्पीड ५-जी इंटरनेटची सेवा असल्याने भारतात व्हिडीओ स्ट्रिमिंगची मागणी जोरदार वाढली आहे. लोक मोठ्या प्रमाणावर व्हिडीओ कंटेट पाहणे तसेच गेम खेळणे पसंत करताना दिसत आहेत. ४-जी नेटवर्कवर व्हिडीओ सुरु होण्यास १.९९ सेकंदाचा वेळ लागत असे. ५-जी नेटवर्कमध्ये हा वेळ आणखी कमी होऊन १.१४ सेकंदांवर आला आहे.

टॅग्स :५जीइंटरनेटभारत