महिनाअखेर आली की मध्यमवर्गीय घरांमध्ये एक ठरलेला संवाद कानावर पडतो, 'अहो, पैसे गेले कुठे? एवढा खर्च झालाच कसा? आता डायरीमध्ये हिशोब मांडण्याचे दिवस गेले आणि बँकिंग ॲप्समध्ये लाल-निळ्या रेषा पाहण्याचे दिवसही आता जुने झालेत. आता तुमचा मोबाइल नुसतं ‘कुठे किती खर्च झाला’ हे सांगत नाही, तर तो एखाद्या फॅमिली डॉक्टरसारखा तुमच्या पैशांची काळजी घेऊ लागला आहे. आर्थिक नियोजनाचा रिमोट कंट्रोल आता ‘एजेंटिक एआय’कडे सरकला आहे. हे केवळ तंत्रज्ञान नाही, तर तुमच्या खिशात बसलेला एक असा मित्र आहे, जो तुम्हाला उधळपट्टी करताना हटकतो आणि भविष्याची बेगमी करताना पाठीवर थाप देतो.देतोय बचतीची शिस्तयापूर्वी एआय फक्त माहिती द्यायचा. आता तो तुमच्या वतीने ‘ॲक्शन’ घेतोय. समजा, तुमच्या खात्यात ५ हजार रुपये विनाकारण पडून आहेत. एआय वाट पाहणार नाही. तो तुमच्या सवयीनुसार तुम्हाला विचारून एखाद्या चांगल्या फंडात ते पैसे वळवेल किंवा तुमचे एखादे महागडे कर्ज असेल तर त्याचा हप्ता भरून टाकेल. ‘उरले तर बचत’ या मानसिकतेकडून तो आपल्याला “आधी बचत, मगच खर्च” या शिस्तीकडे घेऊन जात आहे.काही सेकंदात निर्णयआजच्या धावपळीच्या जगात बाजार समजून घेणे किंवा टॅक्स वाचवण्यासाठी तासनतास बसणे शक्य नसते. इथेच एआय गेमचेंजर ठरतोय. बाजार कोसळला की आपण घाबरून शेअर्स विकतो; पण एआयला भीती वाटत नाही. तो फक्त डेटा बघतो आणि तुमच्या ध्येयानुसार पोर्टफोलिओ सांभाळतो. जे नियोजन करायला पूर्वी महिना जायचा, ते आता काही सेकंदात होतंय. तुमची ऊर्जा वाचतेय आणि पैसा वाढतोय.तुमचा खास मॅनेजरश्रीमंत लोकांसाठी खास फायनान्शिअल मॅनेजर असायचे. आता एआयमुळे ही सोय एका सामान्य नोकरदाराच्या मोबाइलमध्ये आली आहे. तुमचा एक ‘डिजिटल फायनान्शिअल ट्विन’ तयार होतो, जो तुमच्या निवृत्तीचा, मुलांच्या शिक्षणाचा आणि अगदी सुटीचाही हिशोब मांडतो.लगाम तुमच्या हाती ठेवा!‘स्मार्ट’ असला तरी एआय एक अल्गोरिदम आहे. एआयला हृदय नसते, तुम्हाला असते. त्यामुळे आंधळा विश्वास नको. एआयने घेतलेला निर्णय एकदा तपासा. पैसा वाढवणे मशीनचे काम असू शकते; पण तो पैसा 'कुठे' आणि 'का' खर्च करायचा, हा आनंद तुमचाच असला पाहिजे.
८९% स्टार्टअप्सनी त्यांच्या उत्पादनांमध्ये किंवा सेवांमध्ये एआयचा समावेश केला आहे. मानवी चुका टाळल्या जात आहेत.८७% उद्योग सक्रियपणे एआय उपायांचा वापर करत आहेत. यामुळे कामाचा दर्जा सुधारला असून उत्पादकता वाढली.५२% भारतीय ग्राहकांची वैयक्तिक आर्थिक डेटाचे विश्लेषण करण्यासाठी जनरेटिव्ह एआय वापरण्यास संमती.८८% भारतीय ग्राहक पेमेंट चुकू नये, खात्यातील शिल्लक चेक करणे यासाठी 'एआय फायनान्स असिस्टंट' वापरण्यास तयार.
भारतातील प्रमुख एआय फायनान्स ॲप्स... तुम्हाला होईल मदत जंप : हे भारतातील एक प्रगत एआय सुपर-ॲप आहे. हे तुमच्या सवयींनुसार भविष्यातील खर्चाचा अंदाज वर्तवते.मनी व्ह्यू : हे ॲप तुमच्या बँकेच्या एसएमएस द्वारे खर्चाचा मागोवा घेते आणि एआय वापरून त्याचे आपोआप वर्गीकरण करते.क्लीअर टॅक्स : हे भारतीय प्लॅटफॉर्म्स एआयचा वापर करून तुमचा इन्कम टॅक्स डेटा वाचतात, कराची गणना करतात आणि टॅक्स वाचवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय सुचवतात.तेजी मंडी : हे ॲप एआय तंत्रज्ञानाचा वापर करून डेटाचे विश्लेषण करते आणि गुंतवणूकदारांना शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी पोर्टफोलिओ सुचवते.
Web Summary : AI-powered apps now manage your finances, offering savings advice, automated investments, and tax optimization. These digital financial managers help with budgeting, track spending, and plan for the future, putting financial control at your fingertips. Users should still review AI decisions.
Web Summary : एआई-संचालित ऐप्स आपके वित्त का प्रबंधन करते हैं, बचत सलाह, स्वचालित निवेश और कर अनुकूलन प्रदान करते हैं। ये डिजिटल वित्तीय प्रबंधक बजट बनाने, खर्च को ट्रैक करने और भविष्य की योजना बनाने में मदद करते हैं। उपयोगकर्ताओं को एआई निर्णयों की समीक्षा करनी चाहिए।