नवी दिल्ली : येत्या १ एप्रिलपासून टीडीएस व टीसीएसविषयीच्या नियमांत बदल होत आहे. बदलांमुळे टीडीएस व टीसीएसची जटिल प्रक्रिया सुलभ झाल्याने अनेकांना लाभ होणार आहे. नियमांत पुढीलप्रमाणे बदल होतील.
१. एफडी, आरडी, अन्य ठेवींद्वारे मिळणारे व्याजाचे उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तरच ज्येष्ठ नागरिकांचा टीडीएस कपात होईल.२. सामान्यांसाठी कपातीसाठी व्याज उत्पन्न मर्यादा ४० हजारांवरून वाढवून ५० हजार इतकी केली आहे.३. लॉटरी आदी गेमिंगद्वारे एकाच विजयात १० हजार मिळाले तरच कपात होईल. आधी ही मर्यादा वार्षिक दहा हजार रुपयांपेक्षा अधिक इतकी होती. ४. म्युच्युअल फंड, शेअर बाजार गुंतवणुकीवर १० हजारांपर्यंत लाभांशावर आता टीडीएस कपात होणार नाही. आधी ही मर्यादा पाच हजार रुपये होती.५. विमा एजंट व शेअर ब्रोकरांना २० हजारांपर्यंत कमिशनवर टीडीएस नाही. आधी ही मर्यादा १५ हजार रुपये होती.