Join us

एक्सपेन्स रेशो म्हणजे काय? म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या, अन्यथा होईल तोटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 15:56 IST

Expense Ratio : जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एक्सपेन्स रेशोबद्दल माहिती असायला हवे. कारण यामुळे तुमच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो.

Expense Ratio : एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची पद्धत सध्या लोकप्रिय होत आहे. शेअर बाजारातील जोखीम कमी करण्याचा हा उत्तम पर्याय आहे. नवख्या गुंतवणूकदारांनी थेट शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला आर्थिक तज्ज्ञ देतात. म्युच्युअल फंडांनी आतापर्यंत सरासरी १२ टक्के परतावा दिला आहे. चक्रवाढीच्या फायद्यामुळे, ही योजना दीर्घ मुदतीत चांगला नफा देऊ शकते. जर तुम्ही यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला प्रथम एक्सपेन्स रेशोची (Expense Ratio) माहिती असणे आवश्यक आहे. कारण, एक्सपेन्स रेशो तुमची मोठी कमाई खाऊ शकतो.

एक्सपेन्स रेशो म्हणजे काय?मोठमोठ्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या (AMC) म्युच्युअल फंडांचे व्यवस्थापन करतात. कुठलाही फंड चालवण्यासाठी मोठा खर्चही येतो. यामध्ये एएमसी फंड वितरण, मार्केटिंग, तसेच ट्रान्सफर कस्टोडियन, म्युच्युअल फंडांचे कायदेशीर आणि ऑडिटिंग यांसारखे खर्च करावे लागतात. हे सर्व खर्च म्युच्युअल फंडाचे युनिट खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांकडून वसूल केले जातात. हे सर्व खर्च काढल्यानंतर म्युच्युअल फंड योजनेचे निव्वळ मालमत्ता मूल्य मोजले जाते. जर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, आपल्या म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनासाठी जो काही खर्च केला जातो, त्याला खर्चाचे प्रमाण म्हणतात. तुम्हाला किती स्वस्त फंड मिळेल हे कोणत्याही फंडाच्या खर्चाचे प्रमाण (Expense Ratio) ठरवते. कमी किंवा जास्त खर्चाचे प्रमाण तुमच्या परताव्यावर देखील परिणाम करते.

एकाचवेळी सर्व खर्च वसूल केला जात नाहीप्रत्येक कंपनी स्वतःच्या खर्चाचे प्रमाण ठरवते. खर्चाचे प्रमाण एकाच वेळी मोजले जात नाही. फंड हाऊसेस त्यांच्या दैनंदिन खर्चाची हिशोब करतात, त्यानंतर त्याची गणना दररोज केली जाते. वार्षिक खर्चाचे प्रमाण वर्षातील ट्रेडिंग दिवसांद्वारे विभागले जाते. जे एकूण NV वर लागू केले जातात. तुमचा म्युच्युअल फंड व्यवस्थापन तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमधून किती शुल्क आकारत आहे हे एक्सपेन्स रेशो दाखवते.

म्युच्युअल फंडाचे अनेक प्रकारम्युच्युअल फंडाचे अनेक प्रकार आहेत जसे इक्विटी फंड, डेट फंड, बॅलन्स किंवा हायब्रिड फंड. इक्विटी फंड गुंतवणूकदारांकडून घेतलेले पैसे शेअर्समध्ये गुंतवतात. डेट फंड ट्रेझरी बिले, कॉर्पोरेट बाँड आणि सरकारी सिक्युरिटीज यांसारख्या निश्चित उत्पन्न साधनांमध्ये गुंतवणूक करतात. तर हायब्रीडमध्ये इक्विटी आणि डेट फंड यांचे मिश्रण आहे.

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजारपैसा