Join us

'डिजीपिन' म्हणजे काय रे भाऊ? टपाल खातंही झालंय 'हायटेक', आता सांगा 'डिजीटल ॲड्रेस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:43 IST

India Post DIGIPIN: कुरिअर पाठवण्यासाठी तुम्हाला यापुढे पिन कोडची गरज भासणार नाही. भारतीय पोस्ट खात्यानं डिजीपिन सेवा सुरू केली आहे, जी आपल्या लोकेशन को-ऑर्डिनेट्सच्या आधारे डिजीटल पिन कोड तयार करेल.

India Post DIGIPIN: कुरिअर पाठवण्यासाठी तुम्हाला यापुढे पिन कोडची गरज भासणार नाही. भारतीय पोस्ट खात्यानं डिजीपिन सेवा सुरू केली आहे, जी आपल्या लोकेशन को-ऑर्डिनेट्सच्या आधारे डिजीटल पिन कोड तयार करेल. या डिजीटल पिन कोड सेवेचा फायदा म्हणजे तुमचं कुरिअर योग्य पत्त्यावर पोहोचेल. आपण आपले डिजीपिन कसं मिळवू शकता आणि ते कसे काम करेल? सविस्तर जाणून घेऊ.

काय आहे डिजीपिन?

डिजीपिन ही नवीन पत्ता शोधणारी सिस्टम आहे. पोस्ट खात्यानं IIT हैदराबाद आणि ISRO सोबत मिळून ही प्रणाली विकसित केलीये. त्याता हेतू भारतातील कुठल्याही ठिकाणाची अचूक ओळख डिजीटल रुपात करणं ही आहे. या संपूर्ण सिस्टम अंतर्गत देशात ४ मीटर बाय ४ मीटर आकाराच्या छोट्या छोट्या भागात विभाजन करण्यात आलंय. प्रत्येक भागाला यूनिक आयडी देण्यात आलाय. हा आयडी १० आकडी अक्षरांचा एक कोड असेल त्याला डिजीपिन म्हटलं जातं. हा कोड कुठल्याही जागेच्या Latitude आणि Longitude वर आधारित असेल. या सिस्टिममुळे एखाद्या गल्लीबोळातील कुठलंही ठिकाणी सहज अचूक मिळू शकतं. आता कुठल्याही कुरिअरवाल्याला किंवा व्यक्तीला एखादं पार्सल तुमच्यापर्यंत पोहचवण्यात अडथळा किंवा समस्या येणार नाही.

२००० नंतर आता ५०० च्या नोटा बंद होणार का? व्हायरल होणाऱ्या दाव्यामध्ये किती तथ्य, जाणून घ्या

कसा जनरेट कराल DIGIPIN?

  • तुम्हाला डिजीपिन जनरेट करण्यासाठी https://dac.indiapost.gov.in/mydigipin/home या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. 
  • यानंतर तुम्हाला तुमच्या डिव्हाईसचं लोकेशन अॅक्सेस द्यावं लागेल, जेणेकरून तुमच्या लोकेशननुसार डिजीपिन तयार केला जाऊ शकेल.
  • लोकेशन परमिशन दिल्यानंतर तुमचा डिजीपिन जनरेट होईल, त्याचा वापर तुम्ही आपात्कालिन सेवा, लॉजिस्टिक, कुरिअर डिलिव्हरी, इतकंच काय तर कॅब बुक करण्यासाठीही करू शकाल. 

टपाल खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, आयआयटी हैदराबाद, एनआरएससी आणि इस्रोनं DIGIPIN तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामुळे घर, कार्यालय, संस्था आदींच्या नेमक्या ठिकाणाचा डिझाइन 4mx4m मीटरच्या ग्रीडमध्ये तयार करणं सोपं झालंय. प्रत्येक ग्रीडला स्थानाच्या निर्देशांकांवर आधारित एक युनिक अल्फान्यूमेरिक १० कॅरेक्टर्सचा कोड देण्यात आला. हा डिजीपिन सध्याच्या पिन कोडपेक्षा पूर्णपणे वेगळा असेल.

पिनकोडपेक्षा कसा आहे वेगळा?

डिजीपिन आणि पिनकोड दोन्ही पत्ते ओळखण्यासाठी वापरलं जात असलं तरी त्यांची काम करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. पिनकोड हा ६ अंकी क्रमांक असतो जो खूप मोठ्या परिसराची ओळख पटवतो. डिजीपिन ही एक डिजीटल लोकेशन सिस्टम आहे जी संपूर्ण भारतातील कोणत्याही ठिकाणाचं अचूक स्थान ओळखण्यास मदत करतं. ज्याप्रमाणे पिन कोड ६ अंकी असतो, त्याचप्रमाणे डिजीपिन हा १० आकड्यांचा किंवा अक्षरांचा कोड असतो. या प्रणालीमध्ये संपूर्ण देश ४x४ मीटरच्या ग्रिडमध्ये विभागलेला असतो आणि त्यानंतर प्रत्येक भागाला १० अक्षरांचा कोड दिला जातो. एकूणच डिजीपिन अधिक अचूक स्थान देतो तर पिन कोड फक्त परिसराबद्दल माहिती देतो.

टॅग्स :पोस्ट ऑफिससरकार