Join us
Daily Top 2Weekly Top 5

डेटा सेंटर म्हणजे काय? गौतम अदानी यात का करताहेत अब्जावधी रुपयांची गुंतवणूक? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 17:40 IST

What is Data Center: २०३५ पर्यंत भारतात सुमारे २५० अब्ज डॉलर्सचे AI इन्फ्रास्ट्रक्चर इकोसिस्टम उभे राहण्याची अपेक्षा!

What is Data Center: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र AI समजून घेताना 'डेटा सेंटर' समजून घेणे तितकेच गरजेचे आहे. डेटा सेंटर म्हणजे नेमकं काय, ते किती प्रकारचे असतात आणि कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात त्यांची भूमिका का निर्णायक असते? याच पार्श्वभूमीवर अदानी ग्रुपने जाहीर केलेली महत्त्वाकांक्षी AI गुंतवणूक योजना विशेष लक्ष वेधून घेत आहे.

अदानी ग्रुपचा AI वर मोठा डाव...

आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात आता अदानी ग्रुप मोठ्या ताकदीने उतरला आहे. कंपनीने २०३५ पर्यंत १०० अब्ज डॉलर्स (सुमारे ₹८.३ लाख कोटी) गुंतवणुकीचे लक्ष्य जाहीर केले आहे. या गुंतवणुकीचा मोठा हिस्सा AI डेटा सेंटर्स उभारणीसाठी खर्च केला जाणार आहे. या डेटा सेंटर्सची खास बाब म्हणजे, ते पूर्णपणे नवीकरणीय (Renewable) ऊर्जेवर चालणारे असतील.

भारताला केवळ AI वापरणारा देश न ठेवता AI टेक्नोलॉजी विकसित करणारा आणि निर्यात करणारा देश बनवण्याचे उद्दिष्ट आहे. अदानी ग्रुपच्या या योजनेमुळे भारत AI क्षेत्रात जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

AI गुंतवणुकीमुळे काय बदलणार?

अदानी ग्रुपच्या थेट गुंतवणुकीमुळे देशातील औद्योगिक क्षेत्राला गती मिळेल आणि ग्रीन एनर्जीवर चालणाऱ्या हायपरस्केल डेटा सेंटर्सची क्षमता वाढेल. कंपनीनुसार, या पावलानंतर पुढील दशकात सर्व्हर मॅन्युफॅक्चरिंग, क्लाउड सर्व्हिसेस आणि AI संबंधित इतर उद्योगांमध्ये सुमारे १५० अब्ज डॉलरची अतिरिक्त गुंतवणूक येण्याची शक्यता आहे. म्हणजेच, २०३५ पर्यंत भारतात सुमारे २५० अब्ज डॉलरचे AI इन्फ्रास्ट्रक्चर इकोसिस्टम उभे राहू शकते.

डेटा सेंटर म्हणजे नेमकं काय?

आजच्या डिजिटल युगात डेटा हे सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. कंपन्या, बँका, रुग्णालये, सरकारी यंत्रणा...सर्वजण डेटावर अवलंबून आहेत. हा डेटा साठवणे, सुरक्षित ठेवणे, प्रोसेस करणे आणि गरजेनुसार त्वरित उपलब्ध करून देणे, यासाठी जे अत्याधुनिक सिस्टम वापरले जाते, त्याला डेटा सेंटर म्हणतात. पूर्वी डेटा सेंटर म्हणजे एका इमारतीतील सर्व्हर रूम असायची. मात्र आज डेटा सेंटर हे जागतिक नेटवर्क बनले आहे.

फिजिकल सर्व्हर, व्हर्च्युअल मशीन, क्लाउड प्लॅटफॉर्म आणि नेटवर्क्स एकत्र काम करतात. युजरला डेटा एकाच ठिकाणी असल्याचा अनुभव मिळतो. यामुळेच डेटा सेंटरला डिजिटल अर्थव्यवस्थेचा कणा म्हटले जाते. आज डेटा एकाच ठिकाणी न ठेवता विविध ठिकाणी वितरित केला जातो. यामागील मुख्य कारणे गती, सुरक्षा आणि विश्वसनीयता आहे.

डेटा साठवण्याचे तीन प्रमुख मार्ग आहेत:

ऑन-प्रिमायसेस 

कंपनी स्वतःचे सर्व्हर स्वतः सांभाळते. बँका, सरकारी संस्था यांच्यासाठी हे उपयुक्त आहे.

क्लाउड 

डेटा AWS, Google Cloud, Microsoft Azure यांसारख्या थर्ड पार्टी कंपन्यांच्या सर्व्हरवर साठवला जातो. याचा खर्च कमी असतो.

एज लोकेशन्स 

यात डेटा युजरचा जवळ प्रोसेस केला जातो.  IoT आणि रिअल-टाइम सेवांसाठी हे उपयुक्त आहे.

क्लाउड-नेटिव्ह डेटा सेंटर म्हणजे काय?

क्लाउड-नेटिव्ह डेटा सेंटर हे आजचे सर्वात आधुनिक स्वरूप आहे. मायक्रोसर्व्हिसेस, कंटेनर टेक्नोलॉजी यांच्या माध्यमातून अ‍ॅप्लिकेशन्स वेगाने अपडेट करता येतात, सहज स्केल करता येतात आणि वापरकर्त्याला उत्तम अनुभव देता येतो.

व्यवसायासाठी डेटा सेंटर का आवश्यक?

आज कोणताही व्यवसाय डेटा सेंटरशिवाय चालू शकत नाही. ई-मेल, फाइल शेअरिंग, CRM, ERP सिस्टम, AI आणि मशीन लर्निंग या सर्व गोष्टी डेटा सेंटरवर अवलंबून आहेत. त्यामुळे डेटा सेंटर म्हणजे डिजिटल व्यवसायाची पायाभूत रचना आहे.

डेटा सेंटरचे मुख्य घटक

नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर: राउटर, स्विच, फायरवॉल

स्टोरेज सिस्टीम: हार्ड डिस्क, SSD, क्लाउड स्टोरेज

कंप्युटिंग रिसोर्स: उच्च क्षमतेचे सर्व्हर

डेटा सेंटर कसे कार्य करते?

युजरकडून आलेली माहिती डेटा सेंटरकडे जाते, प्रोसेस होते आणि पुन्हा युजरकडे पाठवली जाते. या प्रक्रियेत लोड बॅलेंसर, सिक्युरिटी सिस्टीम, फेलओव्हर मेकॅनिझम महत्त्वाची भूमिका बजावतात.

डेटा सेंटरची सुरक्षा महत्त्वाची

डेटा सेंटरमध्ये अतिशय संवेदनशील माहिती असते. त्यामुळे फिजिकल सिक्युरिटी(बायोमेट्रिक, CCTV, सुरक्षा रक्षक), डिजिटल सिक्युरिटी(फायरवॉल, एन्क्रिप्शन, अँटी-व्हायरस) अत्यंत आवश्यक ठरते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Data Centers: What They Are and Why Adani Invests Billions

Web Summary : Data centers are crucial for AI and economic growth. Adani Group invests billions in renewable-powered AI data centers, aiming to make India a global AI leader. These centers boost server manufacturing and cloud services, potentially creating a $250 billion AI infrastructure ecosystem by 2035.
टॅग्स :गौतम अदानीतंत्रज्ञानअदानी