Join us

संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यात नेमका काय वाद सुरू आहे? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 21:41 IST

मागील काही दिवसांपासून संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यातील वादाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून मोटिव्हेशनल स्पीकर्स, संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यात वाद सुरू आहे. दोघांमधील कथित वादाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. हा संपूर्ण वाद एका कथित घोटाळ्याने सुरू झाला, यानंतर दोघेही सार्वजनिकपणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. देशातील दोन मोठे मोटिव्हेशनल स्पीकर्स समोरासमोर का आले आहे? दोघांमध्ये सुरू असलेल्या वाद काय आहे? जाणून घ्या...

कोण आहेत संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा?संदीप माहेश्वरी देशातील प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर असून, त्यांचे एक मोठे YouTuber चॅनेलदेखील आहे. संदीप माहेश्वरींचे यूट्यूबवर 22.3 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. ते अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखतीही घेतात. तर दुसरीकडे, डॉ विवेक बिंद्रा स्वतःला बिझनेस गुरू म्हणवतात. त्यांचे यूट्यूबवर अनेक चॅनल्स आहेत. ते लोकांना मार्केटिंग आणि व्यवसायाच्या टिप्स शिकवतो. तेदेखील अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतात.

नेमका वाद काय?एका कथित घोटाळ्यावरुन या दोन युट्युबर्समधील वाद सुरू झाला. 11 डिसेंबर रोजी संदीप माहेश्वरी यांनी यूट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी 'मोठा घोटाळा' उघड केल्याचा दावा केला. व्यवसाय शिकवण्याच्या नावाखाली काही लोक हजारो रुपयांचे कोर्सेस विकत आहेत, असे ते म्हणाले होते. या व्हिडिओमध्ये त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही, पण व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर, संदीप माहेश्वरी आणि #StopScamBusiness सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले. यानंतर दुसऱ्या दिवशी संदीप माहेश्वरी यांनी यूट्यूब कम्युनिटी पोस्टमध्ये दावा केला की, काही लोक माझ्या टीमवर व्हिडिओ हटवण्यासाठी दबाव आणत आहेत. या पोस्टनंतर विवेक बिंद्रांनी एक पोस्ट करत संदीप माहेश्वरीला खुले आव्हान दिले.

यानंतर विवेक बिंद्रा आणि संदीप माहेश्वरी समोरासमोर आले. विवेक बिंद्राने आपल्या टीमला कायदेशीर कारवाईची धमकी दिल्याचा दावा संदीप माहेश्वरी यांनी केला. विवेक बिंद्रानेही यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करुन संदीप माहेश्वरीवर अनेक आरोप केले. तसेच, येत्या काळात संदीप माहेश्वरीचा पर्दाफाश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हे प्रकरण इथेच थांबले नाही. त्यानंतर संदीप माहेश्वरीं एक व्हिडिओ अपलोड केला आणि या कथित घोटाळ्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आणि सोशल मीडियावर ट्रेंड सुरू करण्याचे आवाहन केले. महेश्वरीने व्हिडिओमध्ये आरबीआयची काही परिपत्रके दाखवली आणि बिंद्राच्या योजनांना घोटाळा म्हटले. 

सोशल मीडियावर मुद्दा चर्चेत संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा हे दोघेही देशातील सुप्रसिद्ध YouTubers आहेत, ज्यांना करोडो लोक फॉलो करतात. दोघांच्या फॉलोअर्समध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत दोघेही एकमेकांविरुद्ध वाकयुद्ध करत असताना त्यांचे फॉलोअर्स कसे गप्प कसे बसतील. तेदेखील यूट्यूबवर व्हिडिओ बनवत आहेत आणि या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत आहेत. हा मुद्दा अनेक दिवसांपासून ट्विटरवर ट्रेंड करत आहे.

टॅग्स :व्यवसायसोशल व्हायरलसोशल मीडिया