Join us  

काय सांगता? 'या' कंपनीकडून कर्मचाऱ्यांना तब्बल ४ वर्षांचा पगार बोनस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 11:12 AM

कंपनीच्या या बोनसंदर्भात एका व्यक्तीने ब्लुमबर्गशी बोलताना सांगितले की, बोनसची रक्कम ही कर्मचाऱ्याच्या जॉब ग्रेड आणि कार्यक्षमेतवर निर्भर आहे

बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून किंवा कॉर्पोरेट जगतात कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी अनेक सोयी सुविधा पुरवल्या जातात. अनेकदा घर, बाईक, कारही भेट दिली जाते. दिवाळीचा बोनस म्हणूनही महागड्या वस्तू किंवा मोठी रक्कम देण्यात येते. मात्र, आता एका ताइवानी शिपींग कंपनीने कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून तब्बल ४ वर्षांचा पगारच देऊ केला आहे. त्यामुळे, या कंपनीची उद्योग जगतात आणि सोशल मीडियात चांगलीच चर्चा होत आहे. ब्लुमबर्गच्या वृत्तानुसार, एव्हरग्रीन मरीन कॉर्प असं या कंपनीचं नाव आहे. कंपनीने वर्षाअखेरीस कर्मचाऱ्यांना तब्बल ५० महिन्यांचा पगारच बोनस म्हणून दिला आहे. 

कंपनीच्या या बोनसंदर्भात एका व्यक्तीने ब्लुमबर्गशी बोलताना सांगितले की, बोनसची रक्कम ही कर्मचाऱ्याच्या जॉब ग्रेड आणि कार्यक्षमेतवर निर्भर आहे. मोठ्या प्रमाणात देण्यात आलेला हा बोनस केवळ तायवानस्थित काँन्ट्रॅक्ट्सवरच लागू आहे. एव्हरग्रीन मरीन या कंपनीचे नाव एकेकाळी इंटरनेटवर चांगलेच चर्चेत होते. ज्यावेळी, कंपनीचे एक जहाँज स्वेजच्या खाडीत अडकले होते. सुपर टँकर एव्हर गिवेन बालूच्या वादाळादरम्यान खाडीत हे जहाँज आडवे-तिडवे झाले होते. त्यामुळे, स्वेज खाडीतील व्यापार जवळपास एक आठवड्यासाठी ठप्प झाला होता. 

दरम्यान, एव्हरग्रीन मरीनला गेल्या २ वर्षात कोविड महामारीच्या काळात शिपिंग बुममध्ये मोठा फायदा झाला. कंपनीला २०२२ साली २०.७ अब्ज डॉलर्सची कमाई झाल्याची माहिती आहे. गत २०२० च्या विक्रीच्या तिप्पट ही उलाढाल आहे.   

टॅग्स :कर्मचारीपैसाबोट क्लब