Join us

भारतीयांची संपत्ती वाढली; जगातील लोकांची श्रीमंती मात्र आटली,  गमावले ११ ट्रिलयन डॉलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 09:36 IST

आर्थिक महासत्ता अमेरिकेसह चीन आणि जपानचा समावेश आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : शेअर बाजारातील पडझड, आर्थिक अनिश्चितता, डाॅलरमध्ये सातत्याने झालेले चढ-उतार इत्यादी कारणांमुळे जगभरातील लाेकांची संपत्ती तब्बल ११.३ ट्रिलियन डाॅलर एवढी घटली. त्यात आर्थिक महासत्ता अमेरिकेसह चीन आणि जपानचा समावेश आहे. 

धक्कादायक म्हणजे, सर्वाधिक घट अमेरिकेत झाली आहे. मात्र, याउलट भारत, ब्राझील, रशिया आणि मेक्सिकाे या देशांमध्ये लाेकांची श्रीमंती वाढली आहे. भारतातील शेअर बाजारात माेठी वाढ झाली. याशिवाय रिअल इस्टेटही तेजीत आल्याचा परिणाम दिसला आहे.

क्रेडिट सुईसच्या ग्लाेबल वेल्थ अहवालातून याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. २००८मधील जागतिक मंदीनंतर प्रथमच २०२२मध्ये जागतिक पातळीवर लाेकांची संपत्ती घटली आहे.

कशामुळे घट?

जगातील टाॅप १ टक्के लाेकांकडे असलेली संपत्ती घटून ४४.५ टक्क्यांवर आली. शेअर बाजारातील घसरण यामागे सर्वात माेठे कारण आहे. याशिवाय रिअल इस्टेटच्या किमतीही घटल्या. याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे.

६२९ लाख काेटी डाॅलर एवढी संपत्ती जगभरातील लाेकांमध्ये पुढील ५ वर्षांमध्ये हाेईल. रिअल इस्टेट, शेअर, इतर मालमत्तांचा यात समावेश आहे. पुढील पाच वर्षांमध्ये जगभरातील ५.४ अब्ज लाेकांकडील एकूण संपत्ती ६२९ ट्रिलियन डाॅलर एवढी हाेण्याची अपेक्षा आहे.

११.३ ट्रिलियन २.४ टक्के घट जगभरातील लाेकांच्या संपत्तीत २०२२ मध्ये झाली आहे. २.६६ लाख रुपये घट जगभरात प्रति व्यक्ती झाली. २.८ टक्के वाढ भारतात प्रति व्यक्ती झाली.

काेणत्या खंडात कमी घट

क्षेत्र/देश    संपत्ती    बदलआफ्रिका     ६.९५     -१.३ टक्केचीन    ६३.०३     -२.२ टक्केआशिया-प्रशांत     ५०.९०     -४.० टक्केयुराेप      १४७.५     -३.४ टक्केउत्तर अमेरिका     ४२२.६     -५.३ टक्केलॅटिन अमेरिका     २७.२६     -१६.९ टक्के भारत     १३.७३      -२.८ टक्के

या देशांतील लाेकांची एकूण संपत्ती घटली

अमेरिका        ५.९ टक्केजपान        २.५ टक्केचीन        १.५ टक्केकॅनडा        १.२ टक्केऑस्ट्रेलिया        १.०२ टक्के(ट्रिलियन डाॅलर)

 

टॅग्स :पैसा