Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंत व्हायचंय? मग आजपासूनच फॉलो करा 'या' ८ सोप्या पायऱ्या; बचतीपासून गुंतवणुकीपर्यंतचा 'सक्सेस मंत्र'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 17:03 IST

Wealth Creation Guide : आज, आम्ही तुम्हाला बचत करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी आणि श्रीमंत होण्यासाठी तुम्ही उचलू शकता अशा आठ पायऱ्यांबद्दल सांगणार आहोत.

Wealth Creation Guide : केवळ चांगली कमाई करणे म्हणजे श्रीमंत होणे नव्हे, तर कमावलेल्या पैशांचे योग्य नियोजन आणि शिस्तबद्ध गुंतवणूक करणे म्हणजे खऱ्या अर्थाने श्रीमंतीकडे पाऊल टाकणे होय. अनेकांना वाटतं की गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम लागते, पण वास्तवात छोट्या बचतीतूनही मोठा निधी उभा करता येतो. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि श्रीमंत होण्यासाठी तज्ज्ञांनी सुचवलेल्या 'या' ८ प्रभावी स्टेप्स आजच जाणून घ्या.

१. स्पष्ट आर्थिक उद्दिष्टे निश्चित करागुंतवणूक करण्यापूर्वी ती कशासाठी करत आहात, हे ठरवा. निवृत्ती, मुलांचे उच्च शिक्षण, स्वतःचे घर की आर्थिक स्वातंत्र्य? उद्दिष्ट ठरले की, त्यासाठी लागणारी अंदाजित रक्कम आणि कालावधी निश्चित करा. यामुळे तुमच्या बचतीला योग्य दिशा मिळते.

२. ५०-३०-२० नियमाचा बजेटमध्ये वापरतुमच्या मासिक उत्पन्नाचे नियोजन ५०-३०-२० या सूत्रानुसार करा.५०% : अनिवार्य खर्च (घरभाडे, रेशन, बिले).३०% : तुमच्या वैयक्तिक इच्छा (फिरणे, मनोरंजन).२०% : बचत आणि गुंतवणूक.

३. 'एसआयपी'च्या माध्यमातून शिस्तबद्ध गुंतवणूकम्युच्युअल फंडामध्ये दरमहा ठराविक रक्कम गुंतवण्यासाठी SIP हा सर्वोत्तम मार्ग आहे. पगार होताच ही रक्कम आपोआप कापली जावी यासाठी 'ऑटो पे' सेट करा. यामुळे गुंतवणुकीत खंड पडत नाही.

४. सरकारी योजनांचा आधारएसआयपीसोबतच पीपीएफ, ईपीएफ आणि एनपीएस सारख्या सुरक्षित आणि कर सवलत देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करा. निवृत्तीनंतर नियमित पेन्शन आणि मोठा निधी जमा करण्यासाठी या योजना अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

५. केवळ 'एफडी'वर अवलंबून राहू नकाबँक मुदत ठेव सुरक्षित असली तरी, महागाईचा दर वाढल्यामुळे ती पुरेशी ठरत नाही. महागाईला हरवण्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंड आणि इंडेक्स फंडात गुंतवणूक करणे आवश्यक आहे, जेणेकरून दीर्घकाळात चांगले रिटर्न्स मिळतील.

६. कर्जाचा विळखा लवकरात लवकर सोडवातुमच्यावर जर काही कर्ज असेल, तर ते वेळेपूर्वी फेडण्याचा प्रयत्न करा. कर्जातून मुक्त होणे ही एक प्रकारे तुमची 'गॅरंटीड बचत' असते. कर्जाचा बोजा कमी असल्यास तुम्ही अधिक गुंतवणूक करू शकता.

७. विमा कवच: संपत्तीचे सुरक्षा कवचअचानक येणारे आजार किंवा संकट तुमच्या वर्षानुवर्षांची बचत संपवू शकतात. यासाठी पुरेसा हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स घेणे अनिवार्य आहे. यामुळे तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते.

वाचा - गुंतवणूकदारांची दिवाळी! ६ कंपन्यांनी एका आठवड्यात कमावले ६३ हजार कोटी; पण ४ कंपन्यांनी केलं निराश

८. गुंतवणुकीची समीक्षा आणि कर नियोजनदरवर्षी तुमच्या गुंतवणुकीचा आढावा घ्या आणि आवश्यक असल्यास पोर्टफोलिओमध्ये बदल करा. आयकर कलम 80C अंतर्गत मिळणाऱ्या सवलतींचा वापर करा. तसेच, तुमची आर्थिक साक्षरता वाढवून उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यावर भर द्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Wealth creation: Follow these 8 steps for financial success.

Web Summary : Achieve wealth by setting goals, budgeting with the 50-30-20 rule, investing via SIPs, utilizing government schemes, diversifying beyond FDs, clearing debts, securing insurance, and reviewing investments.
टॅग्स :गुंतवणूकम्युच्युअल फंडशेअर बाजारस्टॉक मार्केट