Warren Buffett Close Aide Ajit Jain News: गुरुग्राम हे सध्या अल्ट्रा लक्झरी फ्लॅट्सचे एक मोठं केंद्र म्हणून उदयास येत आहे. प्रसिद्ध अमेरिकन गुंतवणूकदार आणि बर्कशायर हॅथवेचे चेअरमन वॉरेन बफे यांचे विश्वासू सहकारी अजित जैन यांनी गुरुग्राममधील 'डीएलएफ द कॅमेलियास'मध्ये ८५ कोटी रुपयांचा आलिशान फ्लॅट खरेदी केल्याची माहिती समोर आलीये. या फ्लॅटचा आकार ७,४०० चौरस फूट आहे. अजित जैन हे मूळचे भारतीय असून सध्या ते अनिवासी भारतीय आहेत आणि बर्कशायर हॅथवेमध्ये विमा ऑपरेशन्सचे व्हाईस चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. आयआयटी-खडकपूरचे विद्यार्थी राहिलेले जैन यांनी या मालमत्तेची खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नुकतीच दिल्लीला भेट दिली होती.
अनिवासी भारतीयांचं गुरुग्राममधील रिअल इस्टेटमध्ये योगदान
'इकॉनॉमिक टाइम्स'नं दिलेल्या माहितीनुसार, अनिवासी भारतीय आधीच डीएलएफच्या अल्ट्रा-लक्झरी फ्लॅट्सच्या विक्रीमध्ये २५ टक्क्यांहून अधिक योगदान देत आहेत. अजित जैन यांच्यासारखे मोठे अनिवासी भारतीय अशा प्रकल्पांकडे आकर्षित होत आहेत, कारण येथे मिळणाऱ्या जागतिक दर्जाच्या सुविधा काही महिन्यांसाठी भारतात राहू इच्छिणाऱ्या लोकांसाठी मुख्य आकर्षण ठरतात. अजित जैन यांना अमेरिकेतील सर्वात प्रभावशाली भारतीय व्यावसायिकांपैकी एक मानलं जातं.
गाडी खरेदी करणं महागणार, छोट्या कार्सच्या किमतीत १०% पर्यंत वाढ होण्याची शक्यता; कारण काय?
कोरोनानंतर बदललेली ग्राहकांची आवड
रिअल इस्टेट तज्ज्ञांच्या मते, कोरोना महासाथीनंतर श्रीमंत वर्गाच्या राहण्याच्या पसंतीत बदल झाला असून, आता लोक स्वतंत्र बंगल्यांऐवजी 'गेटेड कम्युनिटी'मधील अपार्टमेंट्सना जास्त पसंती देत आहेत. अशा ठिकाणी एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध असतात. नुकतेच एका मोठ्या उद्योगपतीने डीएलएफच्या 'द डहलियास' या नवीन सुपर लक्झरी प्रकल्पात सुमारे ३८० कोटी रुपयांना चार फ्लॅट खरेदी केले आहेत, जो देशातील सर्वात महागड्या अपार्टमेंट व्यवहारांपैकी एक ठरलाय.
किमतीत झालेली ऐतिहासिक वाढ
गुरुग्राममधील मालमत्तेच्या किमती अत्यंत वेगाने वाढल्या आहेत. २०२५ मध्ये गुरुग्रामनं मालमत्तेच्या दरांच्या बाबतीत दिल्लीतील प्रसिद्ध लुटियन्स झोनलाही मागे टाकलंय. येथे प्रति चौरस फूट किंमत मुंबईपेक्षा जास्त झाली असून ती आता लंडन आणि दुबईच्या बरोबरीनं पोहोचली आहे. या भागात १०० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे अनेक व्यवहार झालेत, ज्यात ब्रिटीश उद्योगपती सुखपाल सिंह अहलुवालिया यांनी १०० कोटी रुपयांना खरेदी केलेलं अपार्टमेंट आणि इन्फो-एक्स सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचे संचालक ऋषी पार्टी यांनी १९० कोटी रुपयांना खरेदी केलेल्या पेंटहाऊसचा समावेश आहे.
अल्ट्रा लक्झरी घरांच्या विक्रीत गुरुग्रामची आघाडी
भारतातील हाय-एंड लक्झरी रेसिडेन्शियल मार्केटमध्ये गुरुग्राम आता सर्वात वेगानं वाढणारी बाजारपेठ म्हणून समोर आली आहे. 'इंडिया सोदबी इंटरनॅशनल रिअल्टी' आणि 'सीआरई मॅट्रिक्स'च्या ताज्या अहवालानुसार, २०२५ मध्ये १० कोटी रुपये आणि त्याहून अधिक किमतीच्या घरांची एकूण विक्री २४,१२० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. २०२५ हे वर्ष गुरुग्रामच्या अल्ट्रा-लक्झरी विभागासाठी ऐतिहासिक ठरलं असून, एकूण विक्री मूल्याच्या आधारावर या शहरानं मुंबईलाही मागे टाकलंय.
Web Summary : Ajit Jain, Warren Buffett's aide, purchased a ₹85 crore luxury flat in Gurugram. The city is a hub for luxury real estate, attracting NRIs with world-class amenities. Gurugram's property market is booming, surpassing Mumbai in luxury home sales.
Web Summary : वॉरेन बफे के सहयोगी अजित जैन ने गुरुग्राम में ₹85 करोड़ का लग्जरी फ्लैट खरीदा। शहर लग्जरी रियल एस्टेट का केंद्र है, जो एनआरआई को आकर्षित करता है। गुरुग्राम का प्रॉपर्टी बाजार फलफूल रहा है, लग्जरी घरों की बिक्री में मुंबई को पीछे छोड़ रहा है।