Join us

नफा वाढवायचाय? मग कर्मचाऱ्यांना काढू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 09:44 IST

‘इन्फाेसिस’चा दिलासादायक अहवाल

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सध्या जगभरात ले-ऑफचे भूत कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवर बसले आहे. टेक कंपन्यांमध्ये माेठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्यात आली आहे. नफा घटला, यामागे प्रमुख कारण सांगण्यात येत आहे. मात्र, धाेरणाला छेद देणारी माहिती समाेर आली आहे. कर्मचाऱ्यांना कामावरून त्यांना थांबवून ठेवल्यास कंपन्यांना महसूल आणि नफा वाढविण्यास मदत हाेईल. ‘इन्फाेसिस नाॅलेज इन्स्टिट्यूट’च्या अहवालातून माहिती समाेर आली आहे.

संस्थेने फ्युचर वर्क, अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यातील सर्वेक्षणातील माहितीने टेक कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कंपन्यांनी वर्क फ्राॅम प्रमाण वाढविल्यामुळे कर्मचारी गळती कंपन्यांना आले आहे. कर्मचारी कुठून काम करणार, याकडे भविष्यात कंपन्या जास्त आग्रही राहणार नाहीत. 

सर्वेक्षणामध्ये यांचा हाेता सहभागn१ अब्ज जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांचा सर्वेक्षणात समावेशnअमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड देशांतील २,५०० वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. 

असा वाढला कंपन्यांचा नफाn७७% नफा वाढला जिथे कर्मचारी थांबवून ठेवण्याचे प्रमाण जास्त आहे.n७५% या कंपन्यांची वाढदेखील झाली आहे.

टॅग्स :इन्फोसिसकर्मचारी