Join us

अयोध्येला विमानाने जायचंय! फक्त १० दिवस थांबा, ७० टक्क्यांनी विमान प्रवास स्वस्त होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 16:11 IST

अयोध्येतील राम मंदिरात आज प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आहे, २३ जानेवारीपासून सर्व सामान्यांना दर्शन घेता येणार आहे.

अयोध्येतील राम मंदिरात आज प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. उद्या म्हणजेच २३ जानेवारीपासून मंदिरात सर्वसामान्यांना दर्शन घेता येणार आहे. दरम्यान, आता भाविकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अयोध्यामध्ये जाणाऱ्या विमानांचे भाड कमी होणा आहे. यासाठी तुम्हाला १० दिवस थांबावे लागणार आहे. तुमच्या विमान प्रवासाचे भाडे ७० टक्के कमी होणार आहेत.  

तुम्ही आजपासून दहा दिवसांनी फ्लाइट बुक केल्यास, तुम्हाला हवाई तिकीट फक्त एक तृतीयांश म्हणजे सध्याच्या किमतीपेक्षा ७० टक्के कमी दराने मिळेल. तसेच, राम मंदिरात राम ललाचे दर्शनही लगेच होणार आहे. सध्या अयोध्येला जाणाऱ्या जवळपास सर्वच विमानांच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. २३ जानेवारीला अयोध्येला जाणाऱ्या बहुतांश फ्लाइटची किंमत १० ते १५ हजार रुपयांच्या दरम्यान आहे.

श्रीराम जन्मभुमी अयोध्येवर जगाची नजर, 5 कोटी भाविक येणार; रु. 85000 मध्ये होणार मेकओव्हर!

तुम्ही १० दिवसांनंतर तिकीट बुक केले तर तुम्हाला तेच तिकीट ३००० ते ४००० रुपयांच्या दरम्यान मिळेल. आजपासून १० दिवस म्हणजे ३ फेब्रुवारीपर्यंत दिल्ली ते अयोध्येपर्यंतचे हवाई तिकीट ३५२२ ते ४४०८ रुपयांपर्यंत उपलब्ध असेल.

४ फेब्रुवारीला अयोध्येतून परत विमानाने येण्यासाठी स्पाइस जेट एअरलाइन्सने फक्त ३०२२ रुपयांत तिकीट देत आहे. तर इंडिगो आणि एअर इंडिया एक्स्प्रेसची तिकिटे थोडी महाग आहेत. एअरलाइन्समधील तिकिटे कालांतराने महाग होतात. त्यामुळे आताच वेळेत तिकीट बुक करा.

सध्या दिल्ली आणि अयोध्या दरम्यान तीन एअरलाइन्स उड्डाणे चालवत आहेत. यामध्ये एअर इंडिया एक्स्प्रेस, इंडिगो आणि स्पाइस जेट एअरलाइन्सचा समावेश आहे. यामुळे आता अयोध्ये दौराही स्वस्तात होणार आहे.

टॅग्स :राम मंदिरअयोध्याविमान